फोटो – ट्विटर, दिनेश कार्तिक

टीम इंडियाचा 2019 साली झालेल्या वर्ल्ड कपमधील सेमी फायनलमध्ये पराभव झाला ती दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती. त्यानंतर कार्तिक टीम इंडियाकडून कधीही खेळला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये कार्तिकचा फॉर्मही घसरला होता. त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर संकटात सापड़लं होतं. या आयपीएलमध्ये कार्तिकनं सर्वांचे अंदाज चुकवले आहेत. आयपीएलमधील जबरदस्त फॉर्ममुळे कार्तिकची यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) टीममध्ये निवड व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. या मागणीत तथ्य असल्याची 3 प्रमुख कारणं (DK in T20 World Cup)  आहेत.

जबरदस्त फॉर्म

दिनेश कार्तिकनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना पहिल्या 6 मॅचमध्ये 5 वेळा नाबाद राहात 197 रन केले आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 209.57 आहे. आरसीबीची टीममधील एबी डीव्हिलियर्सच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली खूप मोठी पोकळी भरून काढण्याचं काम कार्तिक करतोय.

दिनेश कार्तिकनं दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 34 बॉलमध्ये नाबाद 66 रन काढले. निदहास ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमधील खेळीची आठवण करून देत कार्तिकनं बांगलादेशचा फास्ट बॉलर मुस्तफिजूर रहमानच्या एकाच ओव्हरमध्ये 28 रन काढले. कार्तिकचा T20 क्रिकेटमधील हा जबरदस्त फॉर्म त्याची T20 वर्ल्ड कपमधील निवडीचं सर्वात मोठं कारण (DK in T20 World Cup) असेल.

अनुभवी चेहरा

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे अनुभवी खेळाडू आहेत. तर मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तुलनेनं नवोदित खेळाडू आहेत. मिडल ऑर्डरमध्ये कार्तिकचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 18 वर्षांचा अनुभव उपयोगी पडणार आहे.

दिनेश कार्तिक नंबर 5 ते 7 या दरम्यान कोणत्याही नंबरवर खेळू शकतो. या नंबरवर येऊन फिनिशरची जबाबादारी उत्तमपणे पार पाडण्याची क्षमता कार्तिकमध्ये आहे. ती त्यानं या आयपीएलमध्ये किंवा यापूर्वीही T20 क्रिकेटमध्ये दाखवून दिली आहे.

दिनेश कार्तिकनं उलट फिरवलं कालचक्र, सनसनाटी विजयानंतर सांगितले यशाचे रहस्य!

महत्त्वाचा बॅकअप

दिनेश कार्तिक हा T20 वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत 3 पातळीवर बॅकअप ठरू शकतो. कार्तिक अनुभवी विकेट किपर आहे. त्यामुळे तो टीम इंडियाचा मुख्य विकेट किपर ऋषभ पंतला बॅक अप असेल. मिडल ऑर्डरमधील एखादा खेळाडू फॉर्मात नसेल तर त्याचा बॅक अप म्हणूनही तो प्लेईंग 11 मध्ये खेळू शकतो. त्याचबरोबर हार्दिक पांड्यासारख्या फिनिशरचा बॅकअप म्हणूनही रोहितसाठी कार्तिक हा उत्तम पर्याय (DK in T20 World Cup) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: