Chahal with
सौजन्य- ट्विटर, राजस्थान रॉयल्स

आयपीएलच्या पंधराव्या सिझनची (IPL 2022) सुरुवात 26 मार्च पासून होत आहे. सर्व टीम मालकांनी विजेतेपदासाठी कंबर कसली आहे. भारत-श्रीलंका T20 सीरिज संपल्यानंतर भारतीय खेळाडू त्यांच्या टीमध्ये दाखल होत आहेत. टी20 सीरीज खेळलेल्या खेळाडुंपैकी युजवेंद्र चहल ह्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. सात वर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून (RCB) खेळणारा चहल आता राजस्थानला जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावण्यासाठी सज्ज आहे. चहलबाबत राजस्थान रॉयल्सच्या एका ट्विटनं क्रिकेट विश्वात चर्चाना उधाण आले. “युजवेंद्र चहल राजस्थान रॉयल्सचा नवा कॅप्टन असेल” अशा आशयाचं ते ट्विट (Chahal Rajasthan Royals Captain) होते.

64 घरांचा सरदार ते 22 यार्डातील सैनिक

‘त्या’ ट्विटनंतर राजस्थान रॉयल्सचा ट्विटर अकाऊंट वरून आणखी एक ट्विट करण्यात आले. त्यामध्या राजस्थान टीमच्या फॉलोअर्सना एक अट ठेवण्यात आली होती. ‘या ट्विटला 10000 रिट्विट आले तर चहल जॉस बटलर(Jos Buttler) सोबत ओपनिंगला येऊ शकतो.’ अशी ती अट होती. त्यामुळे आणखी उलट-सुलट चर्चा सुरू झाली. हे दोन्ही ट्विट चहलने (Chahal Rajasthan Royals Captain) केली असावीत अशी चर्चा आहे

चहलकडून अकाऊंट हॅक?

राजस्थान रॉयल्सनं एका ट्विटच्या माध्यमातून चहलनं टीमचं ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचं जाहीर केलं होतं. त्यावर चहलनं नायक (Nayak Bollywood Movie) सिनेमातील “आप जो बोल रहे है वो बहस के लिये, सुनने के लिये अच्छा है. लेकिन प्रॅक्टिकल नहीं है” हा अनिल कपूरचा डायलॉग असलेला मीम रिप्लाय केला.आरसीबीचा सदस्य असताना त्याचे मैदानावरचे आणि मैदानाबाहेरचे अनेक मजेशीर व्हिडीओ वायरल झाले होते. राजस्थान रॉयल्समध्ये दाखल होताच त्याच्यातील हे ‘कलागुण’ आणखी बहरल्याचं दिसत आहे.

राजस्थान रॉयल्सची मजबूत टीम

कुमार संगकाराच्या (Kumar Sangakkara) मार्गदर्शनखाली रॉयल्सनं यंदा संतुलीत आणि भक्कम टीम बनवली आहे. चहल या टीमचा महागडा स्पिनर (Expensive Spinner in IPL 2022) ठरलाय. त्याला राजस्थाननं साडे सहा कोटींना खरेदी (Chahal Rajasthan Royals Captain) केले. तसेच शिमरॉन हेटमायर, ट्रे़ंट बोल्ट, आर अश्विन, देवदत्त पडिकल, प्रसिद्ध कृष्णा या खेळाडुंना संघात स्थान दिले आहे.

राजस्थान रॉयल्सची टीम- संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जयसवाल, ध्रुव जुरेल, करुण नायर, रासी व्हेन डर डुसेन, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, डॅरेल मिचेल, अरुणय सिंह, रियान पराग, शुभम गढ़वाल, रविचंद्रन अश्विन, जेम्स नीशम, कुलदीप सेन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल, ओबेड मॅकॉय, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा, तेजस बरोका, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: