फोटो – ट्विटर

इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा क्रिकेटमधील मोठा ब्रँड का बनला? या प्रश्नाची अनेक उत्तरं आहेत. या लीगमध्ये पैसा आहे, ग्लॅमर आहे, प्रचंड फॅन्स आहेत ही सर्व कारणं बरोबर आहेत. पण या लीगमध्ये जगातले सर्व बडे खेळाडू खेळतात. या बड्या खेळाडूंच्या अफाट कामगिरीमुळेच आयपीएल स्पर्धा ही क्रिकेट विश्वातील सर्वांत मोठी T20 लीग बनली आहे. पण, आता आगामी आयपीएल नेहमीसारखे नसेल. कारण आयपीएल स्पर्धेतील कल्ट हिरो ख्रिस गेलनं (IPL Cult Hero Gayle) या स्पर्धेतून तलवार म्यान केली आहे.

साधारण सुरूवात आणि…

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गेल एक आक्रमक बॅटर म्हणून प्रस्थापित झाला होता. त्याची ही क्षमता ओळखून त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) करारबद्ध केले होते. तो पहिल्या सिझनची ओपनिंग मॅच खेळला असता तर, मॅकलम चौथ्या क्रमांकावर बॅटींगला येणार होता. पण, गेल सुरूवातीच्या काही मॅच नव्हता आणि मॅकलमनं ओपनिंगला येत इतिहास घडवला.

आक्रमक, सकारात्मक आणि खेळाला पुढे नेणारा क्रिकेटपटू!

केकेआरच्या टीमकडून खेळताना गेलची बस कायम चुकलेलीच होती. आयपीएल 2010 पर्यंत तो या स्पर्धेत फार चाललाच नाही. त्यामुळे 2011 साली झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये गेलला कुणी खरेदीही केले नव्हते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) गेलला बदली खेळाडू म्हणून गेलला स्पर्धा सुरू असताना करारबद्ध (IPL Cult Hero Gayle) केले.

He took That personally

अमेरिकन बास्केटबॉल टीम शिकागो बुल्सवरील ‘द लास्ट डान्स’ या डॉक्युमेंट्रीमध्ये महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन त्याला खटकलेल्या गोष्टी सांगतो. त्यामधील त्याचे ‘So, I took that personally’  हे वाक्य चांगलेच गाजले. त्यावरचे अनेक मीम देखील प्रचलित आहे.

ख्रिस गेल आरसीबीकडून 2011 साली आयपीएलमध्ये परतला त्यावेळी तो देखील जॉर्डन सारखा डिवचला गेला होता. त्याला नाकारणाऱ्या प्रत्येक टीमला त्याने आयपीएलच्या मैदानात धडा शिकवण्याचं (IPL Cult Hero Gayle) ठरवलं होतं. गेलनं 2011 साली झालेल्या आयपीएलमधील 12 मॅचमध्ये 67.55 ची सरासरी आणि 188.13 च्या अफाट स्ट्राईक रेटनं सर्वाधिक 608 रन काढले. तो आरसीबीला थेट फायनलमध्ये घेऊन गेला होता.

Gayle Storm

त्यानंतरच्या काही आयपीएलमध्ये ‘गेल स्ट्रॉम’ (Gayle Storm) हा परवलीचा शब्द बनला. हे वादळ सुरू झालं की फक्त बॉलरच नाही तर स्टेडियममधील प्रेक्षक देखील सुरक्षित आसरा घेऊन खेळ पाहात. कारण गेलच्या बॅटमधून स्टेडियम बाहेर येणारा गोळा त्यांच्यावर कधी आदळेल याचा नेम नव्हता.

जमेकाचा गेल हा आयपीएल मॅचमध्ये गर्दी खेचण्याचं एक मोठं आकर्षण होता. त्या काळात विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर, महेंद्रसिंह धोनी, वीरेंद्र सेहवाग, एबी डीव्हिलियर्स सारखे सुपरस्टार आयपीएलमध्ये होते, पण यापैकी कुणीही गेल इतकं आक्रमक आणि विध्वंसकारक नव्हतं. यापैकी कुणाच्याही खेळात गेलच्या खेळासारखी ठासून अनिश्चितितता, आक्रमकता आणि आत्मविश्वासाकडे जाणारा माज नव्हता. त्यामुळेच गेल हा आयपीएलमधील कल्ट हिरो (IPL Cult Hero Gayle) बनला.

‘युनिवर्स बॉस’ ची आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल थक्क!

गेलची आक्रमकता ही रसेलसारखी मैदानात आला, गिरणी सुरू केली आणि समोर दिसेल त्या बॉलरला बदडले अशी नव्हती. तो शांतपणे त्याचे बॉलर्स हेरत असे आणि त्यांच्या ओव्हर्समध्ये तुटून पडत असे.

गेलच्या या खेळीचं उदाहरण अभ्यासण्यासाठी (IPL Cult Hero Gayle) त्याची पुणे वॉरियर्स विरुद्धची 66 बॉल 175 रनची नाबाद इनिंग पाहिली पाहिजे. त्या मॅचमध्ये भुवनेश्वर कुमारच्या 4 ओव्हर्समध्ये 23 आणि ल्यूक राईटच्या 4 ओव्हर्समध्ये फक्त 28 रन आहेत. गेल अन्य 12 ओव्हरमध्ये त्याने सर्व तोडफोड केली आहे. 13 फोर आणि 17 सिक्सह त्याने नाबाद 175 रन काढले. हा आजही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर आहे.

गेल पर्वाची सांगता

अन्य कोणत्याही क्रिकेटपटूंप्रमाणे वाढत्या वयाचा परिणाम गेलच्या बॅटींगवर झाला. त्यामुळे तो 2 रन साठी पळत नाही. फिल्डिंग करण्यात टाळाटाळ करतो या सर्व गोष्टी आणखी ठळक होत गेल्या. तरीही गेलचा आत्मविशावास कायम होता. त्याला पंजाब किंग्जने (Punjab Kings)  अखेरच्या क्षणी करारबद्ध केले, त्यावेळी ‘तू आयपीएल वाचवलेस’ असे सेहवागला सांगायला तो विसरला नव्हता.   

आयपीएल स्पर्धेतील मोडण्यास कठीण असे काही रेकॉर्ड्स

पंजाब किंग्जकडून गेल अगदी कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात खेळला. त्याला ओपनिंगला न खेळवता नंबर 3 वर खेळवण्यात आले. तो सर्व मॅच खेळला नाही, कधी फिटनेस तर कधी अन्य काही कारणांमुळे तो बाहेर होता. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये त्याने अचानक ब्रेक घेतला. त्याचवेळी त्याला निवृत्तीचे वेध लागले होते.

‘लार्जर दॅन लाईफ’ या शब्दाला जवळचा कोणता खेळाडू अलिकडच्या काळात असेल तर तो ख्रिस गेल होता. त्याच्या इतका आयपीएलमधील नाट्यमय प्रवास कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा नसेल. तो आता आयपीएलमध्ये खेळणार नसल्यानं एका मोठ्या पर्वाची (IPL Cult Hero Gayle) सांगता झाली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: