फोटो – ट्विटर, बीबीएल

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग आहे. जगभरातील क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक असतात. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी राष्ट्रीय कर्तव्याची तडजोड करण्याचीही त्यांची तयारी असते. आयपीलमुळे जगभरातील क्रिकेटपटू एकमेकांच्या जवळ आले. एकाच ड्रेसिंग रूममध्ये त्यांनी एकमेंकापासून क्रिकेटचे कौशल्य शिकले. त्याचवेळी आयपीएलमुळे दोन मित्र शत्रू देखील झाले. ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर अ‍ॅण्ड्रयू सायमंड्सनं (Andrew Symonds) हा गौप्यस्फोट केला आहे. त्याची आणि मायकल क्लार्कच्या मैत्रीमध्ये आयपीएलमुळे वितुष्ट निर्माण झालं, असा आरोप सायमंड्सनं (Symonds on Clarke friendship) केला आहे.

नेमकं काय झालं?

आक्रमक ऑल राऊंडर अशी ओळख असलेल्या सायमंड्सनं 2004 साली ऑस्ट्रेलियन टीममध्ये पदार्पण केले. मायकल क्लार्क आणि त्याची त्याच काळात मैत्री चांगली मैत्री झाली. पण, 2008 पासून या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आणि हळू-हळू त्यांच्यातील नातं संपलं. हे सर्व आयपीएलमधून मिळालेल्या पैशातून घडलं असल्याचा दावा सायमंड्सनं ब्रेट ली पॉकास्टशी बोलताना केला आहे.

सायमंड्स यावेळी म्हणाला की, ‘मला आयपीएलमध्ये खेळल्यामुळे भरपूर पैसे मिळाले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन टीममधील अनेक खेळाडूंना माझ्याबद्दल असूया निर्माण झाल्याचं मॅथ्यू हेडननं मला सांगितलं होतं. कदाचित त्याचवेळी माझ्या आणि क्लार्कच्या मैत्रीमध्ये दुरावा (Symonds on Clarke friendship) निर्माण झाला.’

आयपीएल स्पर्धेचं पहिलं ऑक्शन 2008 साली झाले. त्या ऑक्शनमध्ये सायमंड्स हा सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला होता. त्याला 5 कोटी 40 लाख रूपयांमध्ये डेक्कन चार्जर्सनं खरेदी केले होते.

प्रचंड क्षमतेचा पण वादग्रस्त ऑल राऊंडर!

पैशांमुळे दुरावा

सायमंड्सनं या विषयावर बोलताना पुढे सांगितलं की, ‘पैशांमुळे अनेक चमत्कारिक गोष्टी घडतात. तो चांगलाही असतो. त्याचबरोबर अनेकदा तो विषाचं काम करतो. पैशांमुळे माझ्या आणि क्लार्कच्या मैत्रीमध्ये विष कालवले गेले. मी आजही क्लार्कचा खूप आदर करतो. त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलणार नाही. त्यावेळी कोण काय म्हणालं यामध्येही मला आता पडायचं नाही. त्याची आणि माझी मैत्री आता राहिलेली नाही. मी हे स्वीकारलं आहे. आता मी इथं बसून त्याच्यावर चिखलफेक करणार नाही.

मतभेदाची उदाहरणं

 मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन असताना सायमंड्ससला थेट घरी पाठवलं होतं. टीम मीटिंगला उपस्थित न राहाता मासेमारीसाठी गेल्यानं ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे सायमंड्स आणि क्लार्कमध्ये मतभेदास सुरूवात झाली. 2015 साली सायमंड्सनं क्लार्कच्या कॅप्टनसीवरही टीका (Symonds on Clarke friendship) केली होती. त्यावेळी दारू पिऊन टीम मीटिंगला येणाऱ्या खेळाडूला टीका करण्याचा अधिकार नाही, असं उत्तर क्लार्कनं दिलं होतं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: