फोटो – ट्विटर/ICC

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (World Test Championship Final 2021) पहिल्या दिवसाकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष होतं. या टेस्टचा पहिला दिवस पाण्यात गेला. त्याचवेळी इंग्लंडचा शेजारी देश असलेल्या आयर्लंडच्या क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी आहे. आयर्लंडचा महान क्रिकेटपटू केव्हिन ओ ब्रायन (Kevin O’Brien) आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून रिटायर झाला आहे. 15 वर्ष वन-डे क्रिकेट खेळणाऱ्या या ऑल राऊंडरनं वयाच्या 37 व्या वर्षी रिटायरमेंट जाहीर केली.

T20 आणि टेस्टवर फोकस करणार

केव्हिन ओ ब्रायननं 3 टेस्ट, 153 वन-डे आणि 96 T20 मॅचमध्ये आयर्लंडचं प्रतिनिधित्व केले. “आयर्लंडकडून 153 वन-डे खेळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्टी होती. या काळातील आठवणी नेहमी माझ्या सोबत असतील. आता मी पूर्वीसारखा वन-डे टीममध्ये योगदान करेल असं वाटत नाही.

मला वन-डे क्रिकेट खेळावं असं 100 टक्के वाटत नसतानाही खेळणे हे माझ्या टीमचा कॅप्टन, सहकारी आणि फॅन्ससाठी अन्यायकारक असेल. आगामी 18 महिन्यात दोन T20 वर्ल्ड कप होणार आहे. मी आता त्यावर फोकस करणार आहे. त्याचबरोबर येत्या काळात आणखी काही टेस्ट मॅच खेळेन अशी मला आशा आहे.” असं ओ ब्रायननं यावेळी सांगितले.

पहिला धक्का पाकिस्तानला

2007, 2011 आणि 2015 या तीन वर्ल्ड कपमध्ये ओ ब्रायन (Kevin O’Brien) खेळला. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन दिग्गज टीमना पराभूत करण्यात त्याचे योगदान होते. 2007 साली पहिला वर्ल्ड कप खेळताना (Cricket World Cup 2007) आयर्लंडनं पाकिस्तानचा 3 विकेट्सनं खळबळजनक पराभव केला होता.

ओ ब्रायननं त्या वन-डेमध्ये शोएब मलिकची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. तसंच 133 रनचा पाठलाग करताना नाबाद 16 रनची उपयुक्त खेळी करत आयर्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आयर्लंड विरुद्ध झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे आव्हान त्या वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. आयर्लंड विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे कोच बॉल वुल्मर (Bob Woolmer) यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

6 महिन्यांमध्ये रिटायरमेंट संपले, मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानकडून खेळण्यास तयार

इंग्लंड विरुदध ऐतिहासिक खेळी

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2011) कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंड विरुद्ध ओ ब्रायन ऐतिहासिक खेळी खेळला. बंगळुरुमध्ये झालेल्या त्या वन-डेमध्ये इंग्लंडच्या 327 रनचा पाठलाग करताना आयर्लंडची अवस्था 5 आऊट 111 अशी झाली होती. त्यानंतर ओ ब्रायननं 50 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली. या खेळीत त्याने 13 फोर आणि 6 सिक्स लगावले. ओ ब्रायनच्या 113 रनच्या खेळीमुळे आयर्लंडनं ती मॅच 3 विकेट्सनं जिंकली.

पाकिस्तान विरुद्ध 2013 साली टाय झालेल्या वन-डेमध्ये आयर्लंडकडून ओ ब्रायनचे (Kevin O’Brien) मोलाचे योगदान होते. त्यानं त्या वन-डे मध्ये 47 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: