फोटो – BCCI/IPL

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी T20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 14 वा सिझन (IPL 2021) स्थगित करण्यात आला आहे. चार टीममधील खेळाडू किंवा स्टाफला करोनाची लागण झाल्यानं या आयपीएलमधील 60 पैकी 29 मॅच झाल्यानंतर ही स्पर्धा स्थगित करावी लागली. आता उर्वरित मॅच या वर्षभरात पुन्हा होणार का? (Is IPL 2021 Possible again?) की पुढच्या वर्षी नव्यानं सिझन सुरु होणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर व्यस्त

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा आयपीएल सिझन अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. आम्ही येणाऱ्या काळात ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करु, मात्र या महिन्यात ही स्पर्धा सुरु होण्याची शक्यता नाही.’’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे कॅलेंडर प्रचंड व्यस्त व्यस्त असते. या व्यस्त कालखंडामध्ये एप्रिल आणि मे हे दोन महिने आयपीएलसाठी राखून ठेवले आहेत. मागच्यावर्षी आयपीएल स्पर्धा या काळात होऊ शकली नाही. पण, तेंव्हा सर्वच क्रिकेट बंद असल्यानं बीसीसीआयनं सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीतील रिकाम्या वेळेचा उपयोग करत या स्पर्धेचं (IPL 2020) यूएईमध्ये आयोजन केलं होतं. यावर्षी ही शक्यता नाही. त्यातच यावर्षाच्या शेवटी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपचं यजमानपद देखील भारताकडं आहे. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित 31 मॅचसह T20 वर्ल्ड कपची जबाबदारी (T20 World Cup 2021) देखील बीसीसीआयवर आहे.

किमान 1 महिना हवा

या आयपीएल सिझनमधील उर्वरित 31 मॅच खेळण्यासाठी किमान 1 महिना आवश्यक आहे. भारतीय खेळाडूंसोबत विदेशी खेळाडू देखील आयपीएल खेळतात. या खेळाडूंसाठी आयपीएल टीमनं बरेच पैसे मोजलेत. त्याचबरोबर हे खेळाडू प्रत्येक टीमचा महत्त्वाचा हिस्सा आहेत. त्यामुळे त्यांच्या देशाच्या क्रिकेट कॅलेंडरचा विचारही बीसीसीआयला उर्वरित आयपीएलचं आयोजन करताना करावा (Is IPL 2021 Possible again?) लागेल.

‘या’ महिन्यात मिळू शकते संधी

टीम इंडिया इंग्लंडमधील सीरिज संपवून सप्टेंबर महिन्यात परत येईल. त्या वर्ल्ड कपपूर्वी दक्षिण आफ्रिकेची टीम भारतामध्ये T20 सीरिज खेळण्यासाठी येणार आहे. बीसीसीआय ही सीरिज स्थगित करु शकते. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये अन्य देशांच्याही क्रिकेट सीरिज सध्या प्रस्तावित नाहीत.

वाचा सविस्तर : टीम इंडियाचे 2021 मधील संपूर्ण वेळापत्रक

त्या परिस्थितीमध्ये बीसीसीआय स्पटेंबरमध्ये आयपीएलचं आयोजन करु शकते. भारतामधील कोरोना परिस्थिती तोपर्यंत नियंत्रणात आली तर आयपीएल आणि त्याला जोडून T20 वर्ल्ड कपचं भारतामध्ये आयोजन (Is IPL 2021 Possible again?) होऊ शकतं. अन्यथा या दोन्ही गोष्टी युएईमध्ये होतील. सर्वच देशातील प्रमुख खेळाडूंना T20 वर्ल्ड कपपूर्वी सर्व पिच आणि वातावरणात एक महिना स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयपीएल 2021 मधील उर्वरित 31 मॅच होण्यासाठी सप्टेंबर महिन्याचा बीसीसीआय गांभीर्यानं विचार करण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: