फोटो – ट्विटर/BCCI-IPL

एखादं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी कष्ट देखील तितकेच मोठे करावे लागतात. मोहांच्या वळणावर होणारे अपघात टाळण्यासाठी मोठ्या निग्रहाने वाटचाल करावी लागते. भारतासारख्यी खंडप्राय देशात क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी करावे लागणारे कष्ट ही एक न संपणारी गोष्ट आहे. आपल्या देशात क्रिकेटमध्ये प्रत्येक पातळीवर स्पर्धा आहे. ही स्पर्धा पार करुन यश मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. या आयपीएलमध्ये (IPL 2021) एक बॉलरनं केलेल्या कष्टाचे रिझल्ट आपल्याला दिसत आहेत. त्यानं आयपीएलमध्ये यशस्वी होण्यासाठी आवडत्या बिर्याणीचा त्याग केला. तो पहिल्या 6 मॅचनंतर सध्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सर्वात यशस्वी बॉलर बनला आहे. होय, आम्ही आवेश खानबद्दल (Avesh Khan DC) बद्दल बोलतोय. त्यानं या आयपीएलपूर्वी केलेल्या त्यागाचे परिणाम आता दिसायला लागले आहेत.

तीन वर्षानंतर यश

मध्य प्रदेशकडून (Madhya Pradesh) देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आवेश 2018 पासून दिल्ली कॅपिटल्स टीमचा सदस्य आहे. या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडं (Delhi Capitals) कागिसो रबाडा, नॉर्खिया या दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्ससह इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि उमेश यादव (Umesh Yadav) हे दोन वरिष्ठ भारतीय बॉलर्स आहेत. त्यामुळे आवेशला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल याची शक्यता कमी होती.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या (CSK) मॅचपूर्वी इशांत शर्मा फिट नव्हता आणि दिल्ली कॅपिटल्सनं उमेश यादव ऐवजी आवेश खानची निवड (Avesh Khan) केली. आवेश खाननं दिल्लीच्या मॅनेजमेंटचा तो विश्वास सार्थ ठरवला.

आवेशनं सुरुवातीला अनुभवी फाफ ड्यू प्लेसिसला (Faf du Plessis) शून्यावर आऊट केलं. त्यानंतर चेन्नईच्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरमध्ये तो क्षण आला ज्याची आवेश खान गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होता. त्यानं महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) आऊट केलं.

आवेशला धोनीला आऊट करण्याची संधी 2018 च्या आयपीएलमध्ये पहिल्यांदा आली होती. सीएसकेच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये आवेशच्या बॉलिंगवर धोनीचा उडालेला कॅच कॉलिन मुन्रोनं सोडला होता. त्यावेळी 14 बॉलमध्ये 31 रनवर खेळणाऱ्या धोनीनं अखेर 22 बॉलमध्ये 51 रन काढले. दिल्लीनं ती मॅच 13 रननं गमावली. थोडक्यात सीएसके विरुद्धच्या त्या मॅचमध्ये आवेश खानच्या बॉलिंगवर सुटलेली कॅच दिल्लीला महाग पडली.

आवेशला धोनीविरुद्ध 2019 साली बॉलिंग करण्याची संधी मिळाली नाही. 2020 मध्ये त्यानं धोनीला बॉलिंग केली, पण विकेट मिळाली नाही. अखेरीस 2021 साली आवेशनं धोनीला दुसऱ्याच बॉलवर बोल्ड करत तीन वर्षांची प्रतीक्षा संपवली.

निवड समितीला विसर पडलेल्या खेळाडूनं केला मुंबई इंडियन्सचा पराभव, नव्या रेकॉर्डची नोंद

दिल्लीचा यशस्वी बॉलर

सीएसके विरुद्ध पहिल्याच मॅचमध्ये केलेल्या जोरदार कामगिरीनंतर दिल्लीनं आवेश खानला सर्व मॅचमध्ये संधी दिली आहे. दिल्लीचा नवा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) मॅचच्या सर्व टप्प्यात आवेशचा (Avesh Khan DC) वापर केला आहे. आवेशनं देखील पंतला निराश केलेलं नाही. त्यानं या आयपीएलमधील पहिल्या 6 मॅचमध्ये 7.31 च्या इकॉनॉमी रेटनं 12 विकेट्स घेतल्या आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध (RCB) अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्येही आवेशनं विराट कोहलीला (Virat Kohli) चकवलं. आवेशच्या शॉर्ट लेंथ बॉलला लेट कट मारण्याच्या नादात कोहली फसला आणि आवेशच्या बॉलनं आरसीबीच्या कॅप्टनची दांडी गुल केली.

0,0,0,0,0,1 आंद्रे रसेलला जखडून ठेवणारे मोहम्मद सिराजचे सहा बॉल काय सांगतात?

हे यश सहज मिळालेलं नाही…

आवेश खाननं या आयपीएलची तयारी पूर्वीपासूनच सुरु केली होती. त्यानं वजन कमी करणे आणि आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. त्यानं या कामासाठी एका खासगी डायटिशनची नियुक्ती केली होती. त्यानं आवेशच्या आहारात बदल केले. त्याचं वजन कमी केलं.

दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल सुरु होण्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये अमित मिश्रा (Amit Mishra) आवेशच्या बिर्याणी प्रेमाबद्दल बोलला आहे. आवेश पूर्वी रोज 2-2 किलो बिर्याणी खात होता, आता ते त्यानं बंद केलं आहे, त्याचा रिझल्ट तुम्ही पाहात आहात,’’ असं मिश्रानं सांगितलं.

क्रिकेटमधील फिटनेस जपण्यासाठी आवडत्या खाद्यपदार्थाचा त्याग करणाऱ्या विराट कोहलीचं उदाहरण सर्वांसमोर आहे. आज आवेशही त्याच मार्गावरुन वाटचाल करतोय. आवेशच्या (Avesh Khan DC)  मेहनतीला फॉर्मची जोड मिळाली तर टीम इंडियाकडून खेळण्याचं त्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: