फोटो – ट्विटर

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील अहमदाबादमध्ये झालेली तिसरी टेस्ट फक्त दोन दिवसांमध्ये संपली. या मॅचमध्ये स्पिनर्सचा दबदबा होता. त्यामुळे फार रन निघाले नाहीत. अहमदाबाद टेस्टचं चर्वितचर्वण अजूनही सुरु आहे. त्याचवेळी सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत भारतीय बॅट्समन आक्रमक खेळाचं प्रात्याक्षिक सादर करत आहेत. केरळच्या टीमनं (Kerala) बिहारविरुद्ध 149 रनचं आव्हान फक्त 8.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं

रॉबीन उथप्पा बरसला

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएल स्टार रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) गेल्या काही वर्षांपासून लक्षात राहणारी खेळी करु शकला नव्हता. त्यातच त्याला आता कर्नाटक ही त्याची नेहमीची टीम सोडून केरळकडून देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागत आहे.

महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) यंदा उथप्पाला राजस्थान रॉयल्सकडून खरेदी केलं आहे. सीएसकेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी म्हणजे या वर्षी उथप्पा जोरदार फॉर्मात आहे. त्यानं राजस्थान विरुद्धही हा फॉर्म कायम ठेवला. त्यानं फक्त 32 बॉलमध्ये 4 फोर आणि तब्बल 10 सिक्सच्या जोरावर नाबाद 84 रन काढले. आयपीएलमध्ये संथ खेळाबद्दल टीका झालेल्या उथप्पाचा या मॅचमध्ये 266.67 इतका स्ट्राईक रेट होता. बिहारचं टार्गेट माफक होते. अन्यथा उथप्पानं आज युसूफ पठाणचा 40 बॉलमध्ये शतक करण्याचा 2010 पासून अबाधित असलेला विक्रम सहज मोडला असता.

( युसूफ पठाणची निवृत्ती, वाचा धडाकेबाज ऑल राऊंडरच्या अविस्मरणीय खेळी!)

रॉबीन उथप्पाच नाही तर केरळचे सर्वच बॅट्समन या मॅचमध्ये जोरात होते. दिल्ली कॅपिटल्सनं यंदा समाविष्ट केलेल्या विष्णू विनोदनं (Vishnu Vinod) 12 बॉलमध्ये 2 फोर आणि 4 सिक्सच्या जोरावर झटपट 37 रन काढले. तर संजू सॅमसननं (Sanju Samson) नाबाद 24 रनची खेळी करण्यासाठी फक्त 9 बॉल घेतले. त्यातही संजूनं 2 फोर आणि 2 सिक्स खेचत केरळला (Kerala) 8.5 ओव्हरमध्ये म्हणजे अवघ्या 53 बॉलमध्ये 149 चं आव्हान 9 विकेट्स राखून पूर्ण करुन दिलं.

श्रीसंतचा भेदक मारा

यापूर्वी आयपीएल टीमनं नाकारलेल्या श्रीसंतनं (Sreesanth) केरळकडून भेदक बॉलिंग केली. त्यानं 9 ओव्हरमध्ये 30 रन देत 4 विकेट्स घेतल्या. अनुभवी जलस सक्सेनानं 3 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. बिहारकडून बाबूल कुमारनं एकाकी झुंज देत 64 रन काढले. पण, त्याला दुसऱ्या बाजूनं कुणीही साथ दिली नाही. त्यामुळे बिहारची संपूर्ण इनिंग 40.2 ओव्हरमध्ये 148 रनवर संपुष्टात आली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: