फोट – ट्विटर/@BCCIdomestic

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy 2021) मध्ये केरळच्या (Kerala) मोहम्मद अझहरुद्दीननं (Mohammed Azharudden) धमाकेदार इनिंग करत संपूर्ण भारतीय क्रिकेटचं लक्ष स्वत:कडं वेधून घेतलं आहे. मुंबई (Mumbai) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये त्यानं फक्त 37 बॉल्समध्ये सेंच्युरी पूर्ण केली. सेंच्युरीनंतरही त्याच्या बॅटचा पट्टा थांबला नाही. त्यानं 54 बॉल्समध्ये नाबाद 137 रन्स काढले. या खेळीत त्यानं 11 सिक्स आणि 9 फोरसह अनेक रेकॉर्ड केले.   

अझरचे अनेक रेकॉर्ड्स

अझर, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केरळकडून सेंच्युरी झळकावणारा पहिला बॅट्समन बनला. त्याचबरोबर त्यानं या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची जलद सेंच्युरी झळकावली. या स्पर्धेत सर्वात जलद सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नाववर आहे, त्यानं 32 बॉल्समध्ये हा पराक्रम केला होता.

के.एल. राहुलला टाकलं मागं!

भारतीय खेळाडूनं देशांतर्गत T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक रन्स करण्याच्या यादीत अझर आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं के.एल. राहुलला (K.L. Rahul) मागं टाकलं. राहुलनं IPL 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विरुद्ध 132 रन्सची खेळी केली होती. भारतीयांकडून T20 मध्ये सर्वात जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नावावर आहे. अय्यरनं 2019 साली सिक्किमच्या विरुद्ध नाबाद 147 रन्स काढले होते.

मुंबईचा मोठा पराभव

या मॅचमध्ये मुंबईनं पहिल्यांदा बॅटींग केली. मुंबईकडून यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि आदित्य तरे (Aditya Tare) यांनी 88 रन्सची ओपनिंग पार्टरनरशिप केली. यशस्वीनं 40 तर आदित्यनं 42 रन्स काढले. मुंबईचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 19 बॉल्समध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 38 रन्स काढले.

मुंबईच्या सर्वच बॅट्समननं उपयुक्त खेळी केली. त्यामुळे मुंबईनं केरळपुढे विजयासाठी 197 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. केरळचा एस. श्रीसंत (S. Sreesanth) या मॅचमध्ये अपयशी ठरला. त्याच्या 4 ओव्हर्समध्ये मुंबईनं 47 रन्स वसुल केले. त्याचबरोबर श्रीसंतला एकही विकेट घेता आली नाही.

( वाचा : श्रीसंतचं 7 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये कमबॅक, संजू सॅमसनच्या कॅप्टनसीखाली खेळणार स्पर्धा )

 केरळचा आठ विकेट्सनं विजय

केरळनं हे आव्हान अझरच्या सेंच्युरीमुळे 15.5 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. अझरला रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) 33 आणि कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) 22 यांनी साथ देण्याचं काम केलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: