भारतामध्ये कोरना व्हायरसची दुसरी लाट वेगानं पसरत आहे. महाराष्ट्रात याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. सचिननं स्वत:  ट्विटरवरुन माहिती दिली. सचिननं ही माहिती देताच जगभरातून त्याच्या चांगल्या तब्येतीबाबत प्रार्थना केली जात आहे. मात्र इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसन (Kevin Pietersen) याने या निमित्तानं केलेल्या एका ट्विटमुळे (Pietersen Tweet) अनेकांच्या संतापात भर पडली आहे.

सचिनचे ट्विट काय होते?

सचिन तेंडुलकरनं शनिवार, 27 मार्च 2021 रोजी ट्विट करुन कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली. ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्यात काही लक्षणं आढळले आहेत. त्यानंतर मी स्वत:ला घरामध्येच क्वारंटाईन केले. आता मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार राहत आहे, आणि कोरोना प्रोटोकॉलचे संपूर्ण पालन करत आहे. तुम्हा सर्वांना सुरक्षित राहण्याची गरज आहे. आपल्यासाठी काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार.’

सचिननं कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचं जाहीर करताच काही तासांनी इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसननं ट्विट केलं. जे सध्या वादग्रस्त बनले आहे. पीटरसन ट्विटमध्ये म्हणतो, ‘मी कोरोना पॉझिटीव्ह आहे, हे संपूर्ण जगाला सांगण्याची गरज काय आहे? हे मला कुणी सांगेल का?’

पीटरसनच्या या ट्विटवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) यानेही, ‘तुला हे ट्विट आजच का करावे वाटले? असा प्रश्न विचारला आहे.

युवराजसह काही जणांनी ट्विट करुन नाराजी व्यक्त केल्यानंतर पीटरसननं आपल्याला चुकीची जाणीव झाल्याची कबुली दिली. त्याने आपल्याला ही गोष्ट आत्ता लक्षात आली असं सांगत,सचिन तेंडुलकरला लवकर बऱ्या होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

पीटरसन बहुतेक काळ भारतामध्येच असतो. आता आयपीएल स्पर्धेच्या तोंडावर भारतीय फॅन्सचा राग ओढावून घेण्याची त्याची इच्छा नसेल. त्यामुळे त्याने या प्रकरणावर तातडीने पडदा टाकला. मात्र त्याच्यासारख्या ट्विटरवर कायम सक्रीय असणाऱ्या व्यक्तीला सचिनला कोरोना झाला हे माहिती नसेल याचं आश्चर्य आहे. पीटरसनला संशयाचा फायदा दिला तरी त्याच्या ट्विटचं (Pietersen Tweet) टायमिंग चुकलं हे मात्र नक्की आहे.

( वाचा : IND vs ENG : ‘सेंच्युरीनंतर दोन्ही कानात बोटं का घातली?’, केएल राहुलनं सांगितलं कारण…)

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: