फोटो – BCCI/ट्विटर

नव्या टीम इंडियाचा (New Team India) फिटनेस हा मुख्य मंत्र आहे. टीममधील सर्व खेळाडू मैदानात चपळ हवेत हा आग्रह महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) कॅप्टन असताना वाढला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये YO YO टेस्ट हे क्रिकेटपटूंचा फिटनेस मोजण्याचं एकक बनलं. आता ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज जिंकल्यानं टीम इंडियाची क्रिकेट विश्वात प्रतिष्ठा वाढली आहे. त्याचबरोबर भारतीय फॅन्सच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत.

नव्या टेस्टला BCCI ची मंजुरी

भारतीय खेळाडूंच्या मैदानावरील हलचाली अधिक चपळ व्हाव्या यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) नव्या फिटनेस टेस्टला मंजुरी दिली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’नं हे वृत्त दिलं आहे.  नव्या फिटनेस टेस्टमध्ये क्रिकेटपटूंचा वेग आणि क्षमतांची परीक्षा घेतली जाणार आहे.

( वाचा : IND vs AUS: होय, आपण (तरीही) पुन्हा जिंकलो! )

काय आहे टेस्ट?

BCCI नं कराराबद्ध केलेले तसंच या कराराच्या बाहेरील पण टीम इंडियामध्ये ज्यांची निवड झाली आहे, अशा सर्वांना ही टेस्ट देणं आवश्यक आहे. या खेळाडूंचा वेग आणि क्षमता तपासण्यासाठी त्यांना 2 किलोमीटरची रनिंग टेस्ट (Running Test)  देणं आवश्यक आहे. फास्ट बॉलर, आणि अन्य खेळाडूंसाठी वेगळी कालमर्यादा (Time limit) निश्चित करण्यात आली आहे.

BCCI च्या नव्या नियमानुसार फास्ट बॉलर्सना 2 किलोमीटरचं अंतर 8 मिनिटं 15 सेकंदामध्ये तर अन्य खेळाडूंना हे अंतर 8 मिनिटं आणि 30 सेकंदामध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे.

( वाचा : IND vs ENG: पहिल्या दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर, ‘हा’ आहे नवा चेहरा! )

दरवर्षी होणार बदल

BCCI च्या अधिकाऱ्यानं ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीनुसार “टीम इंडियाच्या यशात खेळाडूंच्या फिटनेसाची मोठी भूमिका आहे. त्यामुळे फिटनेस स्तर आणखी उंचावण्याची गरज आहे. त्यासाठी ही टाईम ट्रायल घेतली जाणार आहे. दरवर्षी या टेस्टमध्ये आणखी बदल होतील आणि ती आणखी अवघड होईल’’

कधी द्यावी लागणार टेस्ट?

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी या टेस्टला मान्यता दिली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या सर्व करारबद्ध खेळाडूंसाठी ही टेस्ट वर्षातून तीनदा होणार आहे. यावर्षी फेब्रुवारी, जून तसंच सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ही टेस्ट होणार आहे.

( वाचा : टीम इंडियाचे 2021 मध्ये भरगच्च वेळापत्रक, पाच प्रमुख आव्हानांचा करावा लागणार सामना! )

YO YO टेस्टचं काय?

भारतीय खेळाडूंचा फिटनेस मोजणी एकक असलेली YO YO टेस्ट यापुढेही कायम असेल. ही टेस्ट पास होण्यासाठी 17.1 हा किमान स्कोअर करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: