फोटो – ट्विटर

झारखंड राज्यातील कोणत्याही व्यक्तीला 2005 नंतर महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) बद्दल प्रश्न हमखास विचारला जातो. देशातील खनिज संपत्तीचं कोठार असलेल्या या राज्यानं भारतीय क्रिकेटला ‘कॅप्टन कुल’ दिला. त्यानं झारखंडला देशाच्या क्रिकेटच्या नकाशावर ठळकपणे पुढे आणलं. झारखंडमधील प्रत्येक बॅटरची गेल्या दहा वर्षात धोनीशी तुलना करण्यात आली आहे. त्यात तो खेळाडू विकेटकिपर-बॅट्समन/ बॅटर असेल तर धोनीशी तुलना करणे हे अगदी स्वाभाविक आहे. भारतीय महिला टीम (Team India Women) पुढच्या महिन्यात इंग्लंडला जाणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये पहिल्यांदाच निवड झालेल्या इंद्राणी रॉय (Indrani Roy) हिची भारतीय क्रिकेट वर्तुळात लेडी धोनी (Lady Dhoni, Indrani Roy) अशी ओळख आहे.

धोनीसोबत आणखी एक साम्य

इंद्राणीनं वयाच्या 15 व्या वर्षापासून क्रिकेट गांभीर्यानं खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेटवरील फोकसमुळे तिला परीक्षेत कमी मार्क पडले. त्यामुळे तिनं वडिलांचं रागवणं देखील सहन केलं. त्यावेळी इंद्राणीच्या कोचनं तिच्या वडिलांना समजावलं. त्यामुळे तिचं क्रिकेट थांबलं नाही.

इंद्राणीची लवकरच देशाच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाली. या यशाचा आनंद तिला फार काळ घेता आला नाही. तिला 2017 साली बंगाल टीमनं टीममधून वगळलं. त्यानंतर ती अन्य राज्यांच्या टीमकडून खेळण्याचं ठरवलं. ती झारखंडच्या क्रिकेट क्लबमधून यापूर्वी देखील खेळली होती. त्यामुळे झारखंडच्या टीममध्ये तिची निवड होण्यास अडचण आली नाही. ती 2017 पासून झारखंडच्या क्रिकेटची टीमची सदस्य आहे.

टीम इंडियाला मिळाला नवा हेड कोच, अडीच वर्षांपूर्वीची कारकिर्द ठरली होती वादग्रस्त

इंद्राणी रॉय (Lady Dhoni, Indrani Roy) ही महेंद्रसिंह धोनी प्रमाणेच विकेट किपर – बॅटर आहे. ती झारखंडच्या टीममधून भारतीय टीममध्ये आली आहे. धोनी आणि तिचं साम्य इथंच संपत नाही. तिनं धोनी प्रमाणेच टीम इंडियात येण्यापूर्वी रेल्वेमध्ये नोकरी देखील केली आहे.

धोनीकडून मिळाल्या टीप्स

इंद्राणी रॉयचा आदर्श स्वाभाविकच महेंद्रसिंह धोनी आहे. धोनीचा खेळ बघत ती मोठी झाली. मागच्या वर्षी झारखंड महिला क्रिकेट टीमच्या कॅम्पमध्ये इंद्राणीला धोनीकडून टीप्स मिळाल्या. बॅटींगसोबतच विकेट किपरनं बॉल कसा हातळला पाहिजे या टीप्स इंद्राणीला धोनीकडून मिळाल्या. धोनीकडून प्रत्यक्ष क्रिकेट शिकायला मिळणे हा अभिमानाचा क्षण असल्याचं इंद्राणी सांगते. या टीप्समुळे तिच्या खेळात फरक पडल्याचंही तिनं मान्य केलं आहे.

कोरोनामुळे आई आणि मोठी बहीण गमावलेल्या क्रिकेटपटूचं हृदयस्पर्शी पत्र

टीम इंडियात निवड

इंद्राणी रॉयचा (Lady Dhoni, Indrani Roy) टीम इंडियामध्ये निवड होण्यापर्यंतचा प्रवास हा संघर्षाचा आहे. यावर्षी झालेल्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत इंद्राणीनं 8 मॅचमध्ये 76 च्या सरासरीनं 456 रन काढले. यामध्ये दोन शतकांचा देखील समावेश आहे. या कामगिरीमुळे निवड समितीला इंद्राणीकडं दुर्लक्ष करता आलं नाही. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियात इंद्राणीची निवड झाली आहे. इंग्लंड दौऱ्यात अंतिम 11 मध्ये संधी मिळाली तर त्याचं सोनं करण्याचा इंद्राणी नक्की प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येत्या काळात तिची ‘लेडी धोनी’ च्या पलिकडे ‘इंद्राणी रॉय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: