
टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) वरील निवड समितीचा विश्वास कमी झाला आहे. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियात (IND vs SL) कुलदीप हा भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) नंतर सर्वात जास्त वन-डे खेळलेला बॉलर आहे. त्याच्या या अनुभवानंतरही कुलदीपची अंतिम 11 मधील जागा निश्चित नाही. कुलदीप यादवची कामगिरी का ढासळली? (Kuldeep Yadav Problem) याचे नेमके कारण आता समोर आले आहे.
कुलदीपचा रेकॉर्ड
कुलदीप यादवनं 2017 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध धरमशाला टेस्टमध्ये पदार्पण केले. त्या टेस्टमध्ये विराट कोहली जखमी झाल्यानं कुलदीपला संधी मिळाली होती. पहिल्याच इनिंगमध्ये 4 विकेट्स घेत त्याने ही निवड सार्थ ठरवली. त्यानंतर तो पुढे वन-डे आणि T20 टीमचाही नियमित सदस्य बनला.
कुलदीपच्या नावावर टेस्टमध्ये 26, वन-डेमध्ये 105 आणि आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 39 विकेट्स आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये अजित आगरकरनंतर भारताकडून वेगवान 50 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन-डेमध्ये आणि वेस्ट इंडिज विरुद्ध T20 क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेण्याची कामगिरी त्याने केली आहे. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सोबत त्याची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होती.
कधी हरवला फॉर्म?
कुलदीप यादवच्या खराब कामगिरीला सुरुवात 2019 च्या आयपीएलमध्ये झाली. या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या (RCB) मॅचमध्ये मोईन अलीनं (Moeen Ali) त्याची धुलाई केली. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये बॉलरची धुलाई होणे ही नवी गोष्ट नाही. जवळपास सर्वच बॉलर्सना यामधून जावं लागलं आहे. कुलदीपला ती धुलाई चांगलीच लागली. भर मैदानात कुलदीपचा रडवलेला चेहरा (Kuldeep Yadav Problem) सर्वांनी पाहिला.
आरसीबी विरुद्ध झालेली मॅच हा कुलदीपच्या करियरमधील टर्निंग पॉईंट होता. त्यानंतर झालेल्या वर्ल्ड कपमध्ये (Cricket World Cup 2019) कुलदीपनं एका भन्नाट बॉलवर बाबर आझमला (Babar Azam) चकवलं होतं. पण, त्याचा तो फॉर्म संपूर्ण स्पर्धेत टिकला नाही. 7 मॅचमध्ये 6 विकेट्स घेणाऱ्या कुलदीपची वर्ल्ड कपच्या शेवटच्या टप्प्यात रवींद्र जडेजानं जागा घेतली.
कुलदीप इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीमचा सदस्य नाही. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात चेन्नई आणि अहमदाबाद या स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर झालेल्या चार पैकी फक्त एका टेस्टमध्ये त्याला संधी मिळाली. तब्बल 2 वर्षांनी संधी मिळूनही चेन्नई टेस्टमध्ये त्याच्या वाट्याला फक्त 12 ओव्हर्स (Kuldeep Yadav Problem आल्या. कुलदीप इंग्लंड दौऱ्यावर दोन वन-डे खेळला. त्या दोन वन-डेमध्ये 68 आणि 84 रन केल्यानंतरही त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर जानेवारी 2020 नंतर तो एकही आंतरराष्ट्रीय T20 मॅच खेळलेला नाही. शेवटच्या काही आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये त्यानं 50 पेक्षा जास्त सरासरीनं रन देऊन मोजक्याच विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या वर्षीच्या आयपीएलमध्ये मोजकी संधी मिळालेल्या कुलदीपला या सिझनमधील पूर्वार्धात (IPL 2021) बेंचवरच बसावे लागले आहे.
2 वर्षांपासून विचारत नाही कुणी, टीम इंडियाच्या बॉलरला आठवला महेंद्रसिंह धोनी!
‘तो बॉलकडे नाही, कॅप्टनकडे बघतो’
टीम इंडियाचा माजी विकेट किपर दीपदास गुप्ता (Deep Dasgupata) याने कुलदीपची नेमकी अडचण सांगितली आहे. कुलदीप प्रतीकुल परिस्थितीमध्ये हार मानतो. एक ओव्हर खराब झाली की, त्याचे खांदे पडतात. (Kuldeep Yadav Problem एखाद्या बॉलवर त्याला फोर लगावला तर तो बॉलकडे नाही, तर कॅप्टनचा चेहरा पाहत असतो.’ असे मत गुप्तानं व्यक्त केलं आहे.
“कुलदीपनं यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे पुन्हा एकदा तशी कामगिरी करण्याची क्षमता आहे. पण, त्याने स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे, हे मी माझ्या अनुभवावरुन सांगतो.’’ असे गुप्तानं स्पष्ट केले.
“कोणत्याही क्रिकेटपटूचे करियर पाहिले तर त्यामध्ये खराब कालखंड कधी ना कधी होता, हे लक्षात येते. त्या कालखंडात त्यांनी स्वत:ला कसं सावरलं हे खूप महत्त्वाचं आहे. कुलदीपनंही स्वत:ला सावरलं पाहिजे, (Kuldeep Yadav Problem तसं झालं तर तो लवकरच पुन्हा यशस्वी होईल.’’ असा दावा गुप्ता यांनी केला आहे.
विराट कोहलीनं सांगितलं कुलदीप यादवला न खेळवण्याचं कारण
श्रीलंका दौऱ्यात शेवटची संधी
कुलदीप यादवला यावर्षी होणारा T20 वर्ल्ड कप खेळायचा असेल तर त्याच्यासाठी श्रीलंका दौरा हा शेवटची संधी आहे. कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती हे चार स्पिनर या टीममध्ये आहेत. या चार जणांपैकी दोघांना T20 वर्ल्ड कपमध्ये जागा मिळणार आहे. त्यामुळे कुलदीपला टॉप 2 मध्ये यायचं असेल तर या दौऱ्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.