फोटो – सोशल मीडिया

संपूर्ण जगातील सर्वोत्तम गायिका, स्वर सम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले. त्यांच्यावर 28 दिवस मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकरांचा आवाज म्हणजे साक्षात सरस्वती देवीचा आवाज. गेली आठ दशके या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनानंतर जगभरातून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया हे याचे उदाहरण आहे. बहुसंख्य भारतीयांप्रमाणेच लता मंगेशकर यांनाही क्रिकेटची आवड होती. त्या टीम इंडियाच्या कट्टर फॅन होत्या. त्यांनी एक फॅन म्हणून भारतीय टीमला शेवटपर्यंत पाठिंबा दिला. त्याचबरोबर सर्वात अडचणीच्या काळात आधार दिला.

39 वर्षांपूर्वीचा किस्सा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आज जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह जगातील अनेक देशांच्या क्रिकेट संस्थांचा कारभार हा बीसीसीआयच्या पैशातून सुरू आहे. बीसीसीआयकडून करारबद्ध खेळाडूंना भरपूर पगार दिला जातो. त्याचबरोबर या खेळाडूंची आयपीएल तसेच जाहिरांतीमधून होणारी कमाई देखील मोठी आहे.

हा 39 वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. देशाच्या बंदीस्त अर्थव्यवस्थेत क्रिकेटची बाजारपेठ मर्यादित होती. क्रिकेटपटूंना देशात लोकप्रियता होती. पण, त्यांना तितका पैसा मिळत नव्हता. त्याच कालावधीत 39 वर्षांपूर्वी म्हणजे 1983 साली भारतीय क्रिकेट बदलणारी घटना घडली.

कपिल देवनं फक्त कॅच नाही तर वर्ल्ड कप पकडला! पाहा VIDEO

लतादीदी पुढे आल्या

इंग्लंडमध्ये 1983 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत कपिल देवच्या (Kapil Dev) कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं वर्ल्ड कप (Cricket World Cup 1983) जिंकला. जगज्जेती भारतीय टीम मायदेशी परतली. त्यांच्या यशानं संपूर्ण देशाला आनंद झाला होता. प्रत्येकाला त्यांच्या खेळाचा अभिमान होता. सर्व भारतीय फॅन्समध्ये लतादीदींचाही समावेश होता.

कपिलची टीम भारतामध्ये परतली. बीसीसीआयसमोर गंभीर प्रश्न होता. त्या काळात बोर्डाची आर्थिक परिस्थिती खराब होती. आज संपूर्ण जागतिक क्रिकेट पोसणारी बीसीसीआय ही संस्था तेव्हा गरीब होती. त्यांच्याकडे खेळाडूंना पुरस्कार देण्यासाठी पैसे नव्हते.

बीसीसीआयच्या या बिकट परिस्थितीमध्ये लता मंगेशकर (Lata Mangeshkar Passes Away)  पुढे आल्या. तत्कालिन बीसीसीआय अध्यक्ष आणि एन.पी.के. साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बीसीसीआयचे पदाधिकारी राजसिंह डुंगरपूरकर यांनी त्यांना खेळाडूंच्या मदतीसाठी लता मंगेशकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम दिल्लीमध्ये घेण्याची सूचना केली. बीसीसीआयनं त्यानंतर याबाबत दीदींना विनंती केली. दीदींनी तातडीने तो प्रस्ताव मान्य केला.’

टीम इंडियासाठी आधार

लता मंगेशकर यांच्या गाण्याचा कार्यक्रम दिल्लीमध्ये झाला. त्या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. वर्ल्ड कप विजेत्या प्रत्येक क्रिकेटपटूला एक लाखांचा पुरस्कार देणे बीसीसीआयला या कार्यक्रमामुळे शक्य झाले. प्रत्येकी एक लाख ही त्या काळातील छोटी रक्कम नव्हती.

विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी या कार्यक्रमासाठी कोणतेही मानधन घेतले नाही. भारतीय खेळाडूंचा आनंद तोच आपला आनंद अशी सच्चा क्रिकेट फॅनसारखी त्यांची (Lata Mangeshkar Passes Away) मानसिकता होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: