फोटो – ट्विटर, बीसीसीआय

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील ऑरेंज कॅपचा नेहमीचा दावेदार केएल राहुल (KL Rahul)  फॉर्मात आला आहे. राहुलनं मुंबई इंडियन्सविरूद्ध दमदार सेंच्युरी झळकावत ते दाखवून दिलंय. राहुलच्या कॅप्टनसीमध्ये लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) ही आयपीएल टीम पहिल्याच वर्षी चांगली कामगिरी करतेय. राहुल सध्या टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन असून रोहित शर्माचा वारसदार म्हणून त्याचं नावंही आघाडीवर आहे. राहुलनं एका मुलाखतीमध्ये टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमेंटच्या निर्णयावर नाराजी (Rahul on Team Management) व्यक्त केली आहे.

काय होता निर्णय?

राहुलनं गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ (Breakfast With Champions) या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यानं 2019 साली टीम इंडियाच्या मॅनेजमेंटनं घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.

राहुलसाठी इंग्लंडमध्ये 2019 साली झालेला वर्ल्ड कप हा चांगला गेला होता. त्यानं त्या वर्ल्ड कपमधील 9 इनिंगमध्ये 2 हाफ सेंच्युरी आणि 1 सेंच्युरीसह 361 रन केले होते. या कामगिरीनंतरही वर्ल्ड कपनंतर लगेच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये राहुलचा समावेश नव्हता. या निर्णयामुळे व्यथित झाल्याची भावना राहुलनं या मुलाखतीमध्ये (Rahul on Team Management) व्यक्त केली.

‘सेंच्युरीनंतर दोन्ही कानात बोटं का घातली?’, केएल राहुलनं सांगितलं कारण…

राहुलला कुणी समजावलं?

राहुलनं या मनस्थितीमध्ये आपल्याला पंजाब किंग्जमधील तेव्हांचा सहकारी आणि वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन ख्रिस गेल (Chris Gayle) याने समजावल्याचं सांगितलं. ‘वेस्ट इंडिजमध्ये माझी आणि गेलची भेट एका पार्टीत झाली. त्यावेळी मी टीममध्ये निवड न झाल्यानं हाताश होतो. याला काही अर्थ नाही, अशी माझी भावना झाली होती. त्यावेळी मला गेलनं समाजावलं.

टीममध्ये खेळणं न खेळणं हे सर्वस्वी तुझ्या हातामध्ये आहेत. 70 रन पुरेसे नसतील तर 150 कर. 150 ही पुरेसे नसतील तर 200 कर. एका आयपीएल सिझनमध्ये 600 रन करणं पुरेसे नसेल तर 800 कर. तू स्वत:ला या जागेवर ने की तुला तिथून कुणीही काढू शकणार नाही,’ असं क्रिकेटमधील युनिव्हर्स बॉसनं आपल्याला समजावल्याचं राहुलनं यावेळी (Rahul on Team Management) सांगितलं.

आजही पोझिशन नक्की नाही

वेस्ट इंडिजमधील या घटनेला आता तीन वर्ष पूर्ण होत आली आहेत. त्यानंतरही राहुलची टेस्ट आणि लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमधील पोझिशन नक्की नाही. तो टेस्ट टीमच्या बराच काळ बाहेर होता. टेस्ट टीममध्ये आपल्याला मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यास सांगितले होते, पण मयांक अग्रवाल जखमी झाल्यानं अचानक ओपनिंगला खेळावं लागल्याचं राहुल  म्हणाला.

2019 नंतर कोहली-शास्त्रींच्या कार्यकाळात राहुल 15 वन-डे खेळला. त्यामध्ये चार वेळा तो ओपनिंगला आला आहे. नंबर 3 आणि नंबर 4 वर प्रत्येकी एकदा तर नंबर 5 वर तो 9 वेळा खेळला आहे. या 15 वन-डेमध्ये राहुलनं 67.1 च्या सरासरीनं 805 रन केले आहेत. यामध्ये 3 सेंच्युरी आणि 5 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: