फोटो – The Telegraph

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान कॅप्टनमध्ये रिकी पॉन्टिंगचा (Ricky Ponting) समावेश होतो. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्त्वाखालीच ऑस्ट्रेलियाने दोनदा वर्ल्ड कप जिंकला. टेस्ट क्रिकेटमध्ये वर्चस्व राखलं. एक कॅप्टन म्हणूनच नाही तर बॅट्समन म्हणून देखील रिकी पॉन्टिंग ‘ऑल टाईम ग्रेट’ आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वात जास्त रन हे पॉन्टिंगचेच आहेत. रिकी पॉन्टिंगची ऑस्ट्रेलियन टीममधील जागा धोक्यात आली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा तत्कालिन कॅप्टन मायकल क्लार्क (Michael Clarke) याने पॉन्टिंगची टीममधील जागा वाचवली, असा गौप्यस्फोट क्लार्कने (Michael Clarke on Ponting) याने केला आहे.

पॉन्टिंगने मोडली परंपरा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खेळाडूनं कॅप्टनसी सोडल्यानंतर टीममध्ये राहण्याच्या कमी घटना आहेत. बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव्ह वॉ किंवा पॉन्टिंगच्या नंतरचा मायकल क्लार्क हे सर्व जण कॅप्टन म्हणूनच रिटायर झाले. रिकी पॉन्टिंग याला अपवाद ठरला. रिकी पॉन्टिंग 2011 च्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर कॅप्टन पदावरुन दूर झाला. त्यानंतर पुढची दीड वर्षे तो ऑस्ट्रेलियन टीममध्ये होता.

काय म्हणाला क्लार्क?

मायकल क्लार्कने एका पॉडकास्टशी बोलताना या विषयावर गौप्यस्फोट (Michael Clarke on Ponting) केला आहे. ‘एखाद्या खेळाडूने कॅप्टनसी सोडल्यानंतर तो टीममध्ये राहिला आहे, असे क्वचित घडले आहे. त्यामुळे तुला रिकी नको असेल तर त्याला जावे लागेल असे निवड समितीने सांगितले होते.’’ अशी आठवण क्लार्कने सांगितली. निवड समितीच्या सूचनेनंतर क्लार्कने पॉन्टिंगचा (Michael Clarke on Ponting) बचाव केला.

“आम्हाला त्याची गरज आहे. तो एक बॅट्समन म्हणून तसेच अतिरिक्त कोच म्हणून हवा आहे. नव्या पिढीला घडवण्यासाठी मला पॉन्टिंगची गरज होती. त्यामुळे मी निवड समितीच्या सदस्यांशी पॉन्टिंगसाठी भांडलो. त्याने त्याच्या क्षमतेच्या 80 टक्के खेळ केला तरीही तो 3 किंवा 4 नंबरवर खेळू शकेल अशा कोणत्याही बॅट्समनपेक्षा चांगला असेल, असे मी त्यांना सांगितले.” असे, क्लार्कने स्पष्ट केले.

रिकी पॉन्टिंगच्या फॉर्ममध्ये घसरण

कॅप्टनसी सोडल्यानंतर रिकी पॉन्टिंगच्या फॉर्ममध्ये घसरण झाली. तो क्लार्कच्या कॅप्टनसीमध्ये 16 टेस्ट खेळला. या टेस्टमध्ये त्याने 37.59 च्या सरासरीने 1015 रन केले. पॉन्टिंगची त्यापूर्वी टेस्टमधील सरासरी 55 च्या आसपास होती. शेवटच्या दीड वर्षातील खराब फॉर्ममुळे तो 51.85 च्या सरासरीने रिटायर झाला.

पहिल्या बॉलपासून जिंकण्याचा प्रयत्न करणारा कॅप्टन!

क्लार्कने मदत केली नाही

रिकी पॉन्टिंगच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्याचा बचाव करणाऱ्या मायकल क्लार्कने व्हाईस कॅप्टन म्हणून मला मदत केली नाही, असा दावा पॉन्टिंगनं त्याच्या आत्मचरित्रात केला आहे. मायकल क्लार्कने देखील ते मान्य केले आहे.

” माझं ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये खेळण्याचे स्वप्न होते. मी कधी कॅप्टन होण्याचा विचार केला नव्हता. त्यामुळे मला व्हाईस कॅप्टनची जबाबदारी आवडली नाही. माझी नेहमी पुढचा कॅप्टन अशी ओळख करु दिली जात असे. त्याचा मला तिटकारा होता. मी एकतर टीममधील खेळाडू म्हणून किंवा टीमचा कॅप्टन म्हणून योग्य होतो. मला याच्या मधील कोणतेही पद नको होते,” असे क्लार्कने सांगितले.

काय आहे क्लार्कचा रेकॉर्ड?

मायकल क्लार्कने 2003 साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाचा भावी कॅप्टन म्हणून ओळखला गेला. गिलख्रिस्ट रिटायर झाल्यानंतर 2008 साली तो ऑस्ट्रेलियन टीमचा व्हाईस कॅप्टन बनला. त्यानंतर 2011 ते 15 या कालावधीमध्ये तो ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता.

क्लार्कच्या कॅप्टनसीमध्येच ऑस्ट्रेलियाने 2015 चा क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2015) जिंकला. मायकल क्लार्क हा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकणारा बॉर्डर, स्टीव्ह व़ॉ आणि रिकी पॉन्टिंगनंतरचा चौथा कॅप्टन आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: