फोटो – ट्विटर, मोहम्मद हाफीज

पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद हाफीज याने इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा (Mohammad Hafeez Retire) केली आहे. क्रिकेटच्या मैदानात ‘प्रोफेसर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या हाफीजच्या 18 वर्षांच्या इंटरनॅशनल करिअरची समाप्ती झाली आहे. 41 वर्षीय हाफीजने इंटरनॅशनल क्रिकेटला रामराम केला असला तरी फ्रँचायझी क्रिकेट मात्र खेळणार आहे. तो आगामी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर टीमकडून खेळेल.

करिअर

मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez Retire) 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. हाफीजने पाकिस्तानकडून 392 इंटरनॅशनल मॅच खेळल्या. यात त्याने 12 हजार 780 रन आणि 253 विकेट्स मिळवल्या. 32 मॅचमध्ये त्याने पाकिस्तानचे नेतृत्वही केले.

फॉर्मेटमॅचरनविकेट्स
टेस्ट55365253
वन डे2186614139
टी-20119251461

हाफीजने यापूर्वी 2020 च्या T20 वर्ल्ड कपनंतर निवृत्त होण्याची घोषणा (Mohammad Hafeez Retire) केली होती. पण, कोरोनामुळे तो वर्ल्ड कप एक वर्षासाठी पुढे गेला आणि हाफिजनं त्याचा विचार बदलला. यूएईमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हाफिज संपूर्ण स्पर्धा खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेली सेमी फायनल हाफिजच्या कारकिर्दीमधील शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती.

रिटायरमेंट का किंग कौन?- शाहिद आफ्रिदी!

9 वर्ल्डकप

मोहम्मद हाफीज याने पाकिस्तानकडून नऊ वर्ल्डकप खेळले. 2007, 2011 आणि 2019 चा वन डे वर्ल्डकप आणि 2007, 2010, 2012, 2014, 2016 आणि 2021 च्या T20 वर्ल्डकपमध्ये हाफीजने पाकिस्तानच्या टीमचे प्रतिनिधित्व केले.

2017 मध्ये पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. फायनलमध्ये पाकिस्तानने टीम इंडियाला 180 रनने पराभव केला होता. या मॅचमध्ये मोहम्मद हाफीज याने महत्त्वाची इनिंग खेळली होती. त्याने 37 बॉलमध्ये नाबाद 57 रन करत पाकिस्तानला 300 हून अधिक रनचे टार्गेट सेट करून दिले होते.

मलिकवर दबाव

मोहम्मद हाफीजच्या निवृत्तीमुळे (Mohammad Hafeez Retire) पाकिस्तानचा आणखी एक ऑलराऊंडर शोएब मलिक (Shoaib Malik) याच्यावरील दबाव वाढला आहे. 39 वर्षीय मलिकने हाफीजच्याही आधी इंटरनॅशल क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. 2001 मध्ये तो आपली पहिली मॅच खेळला होता. अजूनही पाकिस्तानच्या टीमकडून खेळत असून दुबईत झालेल्या वर्ल्डकपमध्ये त्याने पाकिस्तानकडून मॅच खेळल्या होत्या. आता हाफीज निवृत्त झाल्याने 2022 मध्ये मलिकही संन्यासाबाबत निर्णय घेऊ शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: