पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) याच्यासाठी 2006 हे वर्ष स्वप्नवत (Dream Year) ठरले होते. युसूफनं त्या वर्षाच्या सुरुवातीला भारताविरुद्ध (India vs Pakistan) लाहोरमध्ये 173 रनची खेळी केली होती. त्यानंतर त्याने संपूर्ण वर्षभर सगळीकडं रन केले. 2006 मधील या जबरदस्त खेळाचं श्रेय युसूफने धर्मांतराला दिले आहे. ‘आपण वर्षभरापूर्वी इस्लाम धर्म स्विकारला आणि माझ्या खेळात सुधारणा झाली,’ असा दावा युसूफने (Mohammad Yousuf On Islam) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे.

का स्विकारला इस्लाम?

मोहम्मद युसूफचे मुळचे नाव युसूफ योहाना (Yousuf Youhana) हे आहे. मुळचा ख्रिश्चन असलेल्या योहानाने 2005 साली धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्विकारला. पाकिस्तान टीमचा कॅप्टन होण्यासाठी त्याने हे धर्मांतर केले असा आरोप तेंव्हा झाला होता. ‘विस्डेन’ च्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये युसूफनं त्याच्या धर्मांतरचे कारण सांगितले आहे.

माझ्यावर कुणीही इस्लाम धर्म स्विकारण्याची बळजबरी केली नाही. मी आणि सईद अन्वर (Saeed Anwar) हे जवळचे मित्र होतो. मी सईद सोबत खूप वेळ घालवत असे. मी सईदच्या घरी राहिलो तेंव्हा त्याचा परिवार अत्यंत शिस्तबद्ध असल्याचे मला जाणवले. त्याचे आयुष्य मला खूप शांत वाटले. सईद त्याच्या मुलीच्या निधनानंतर धार्मिक बनला होता. त्याला पाहून मलाही इस्लाम धर्म (Mohammad Yousuf On Islam) स्विकारण्याची प्रेरणा मिळाली,’ असे युसूफने सांगितले.

( वाचा : पाकिस्तान क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते? )

‘ती अल्लाहची भेट’

मोहम्मद युसूफनं 2006 मध्ये क्रिकेट खेळताना ट्रेनिंगमध्ये कोणताही फरक केला नसल्याचे सांगितले आहे. ‘मी इस्लाम धर्म स्विकारताच अल्लाहने माझ्यावर कृपा केली. मला आतून एक वेगळीच शांतता जाणवत होती. मी 2006 साली ट्रेनिंग आणि प्रॅक्टीसमध्ये काहीही बदल केला नाही. मी स्वत:ची दाढी वाढवली आणि मला आतून शांतता लाभली. 2006 मधील प्रदर्शन ही अल्लाहची भेट होती, असे मला नेहमी वाटते,’ असे युसूफने स्पष्ट केले आहे.

2006 मधील युसूफची कामगिरी

मोहम्मद युसूफने 2006 साली 99.33 च्या सरासरीने 1788 रन केले. त्याचबरोबर त्याने एका कॅलेंडर वर्षात सर्वात जास्त रन करण्याचा व्हिव रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड तोडला. युसूफने त्यावर्षी 9 सेंच्युरी झळकावल्या. तो तेंव्हा एका वर्षात सर्वात जास्त सेंच्युरीचा रेकॉर्ड होता. त्याचबरोबर त्याने सलग सहा सेंच्युरी झळकावून डॉन ब्रॅडमनच्या रेकॉर्डचीही बरोबरी केली होती.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: