फोटो – BCCI/IPL

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या मॅचमध्ये वरुण चक्रवर्तीनं पहिल्याच ओव्हरमध्ये (Varun Chakrawarthy) 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्या दोन विकेट्समध्ये आरसीबी कॅप्टन विराट कोहलीच्या (Virat Kohli) विकेट्सचाही समावेश होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कॅप्टन इऑन मॉर्गन (Eoin Morgan) यानं काय केलं? तर वरुण चक्रवर्तीला लगेच पुढची ओव्हर दिलीच नाही. चांगलं खेळत असलेल्या खेळाडूला खांबवणं या मॉर्गनच्या सवयीचा फटका कोलकाता नाईट रायडर्सला बसला आहे. त्यामुळेच आज (25 एप्रिल 2021) रोजी केकेआरची टीम पॉईंट टेबलमध्ये सर्वात तळाशी आहे. निव्वळ कॅप्टन आहे म्हणून टीममध्ये असलेल्या इऑन मार्गन याला कारणीभूत (Morgan Trouble for KKR) आहे.

मॉर्गन हा वर्ल्ड कप विजेता कॅप्टन आहे. त्याच्या याच पुण्याईच्या जोरावर त्याला मागच्या आयपीएलमध्ये केकेआरनं करारबद्ध केलं. स्पर्धा अर्धी झाली असताना त्याच्याकडं कॅप्टनसी सोपवली. ज्यानं बॅट्समन म्हणून काहीही भरीव कामगिरी केली नव्हती, त्याच्याकडं केकेआरनं टीमचं नेतृत्त्व दिलं.

मागच्या वर्षी काय केलं?

मॉर्गन कॅप्टन झाला आणि त्यानं चांगलं खेळत असलेल्या खेळाडूला थांबवण्याची त्याची सवय जगाला दिसली. मागच्या सिझनमध्ये आरसीबी विरुद्ध 84 रन्स वाचवायचे असताना आदल्या मॅचमध्ये 5 विकेट्स घेणाऱ्या लॉकी फर्ग्युसनला (Lockie Ferguson) याला त्यानं थेट सातव्या ओव्हरमध्ये बॉलिंग दिली. सीएसके विरुद्ध आंद्रे रसेलच्या (Andre Russell) आधी रिंकू सिंहला पाठवण्याचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठीनं चांगली सुरुवात केल्यानंतर तो अगदी 8 व्या क्रमांकावर बॅटींगला आला. मॉर्गनच्या कॅप्टनसीमधील गोंधळामुळे केकेआरला प्ले ऑफ गाठण्यात अपयश आलं.

कार्तिक गेला, मॉर्गन आला, केकेआरचा गोंधळ आणखी वाढला!

पाया ठिसूळ

कोणत्याही टीमच्या बॅटींग ऑर्डरचा पाया हा टॉप 3  बॅट्समन असतात. तो पाया भक्कम असेल तर इमारत भक्कम होते. केकेआरच्या टॉप 3 मध्ये नितिश राणा, शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे तीन तरुण भारतीय बॅट्समन आहेत. यापैकी गिल फॉर्मात नाही. तर राणा आणि त्रिपाठीकडं सातत्य नाही. त्यामुळे टीमला भक्कम सुरुवात करुन द्यायला ते अपयशी ठरले आहेत.  

केकेआरनं यावर्षीच्या आयपीएल ऑक्शनमध्ये (IPL Auction 2021) कमी पैशांमध्ये चांगली शॉपिंग केली. त्यांनी शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) टीममध्ये घेतलं. हसनचा तिसऱ्या क्रमांकावर वापर करणे आवश्यक होते. मॉर्गननं त्याला लोअर ऑर्डरमध्ये खेळवलं. तीन मॅचनंतर काढून टाकलं. (Morgan Trouble for KKR)

मॉर्गनचा फॉर्म कुठे आहे?

टॉप थ्री फॉर्मात नसताना चौथ्या क्रमांकावर बॅटींगला येणाऱ्या मॉर्गननं टीमला स्थैर्य देणं किंवा गरज पडली तर टॉप थ्री मध्ये येणं आवश्यक आहे. पण मॉर्गन त्याचा फॉर्म इंग्लंडमध्येच विसरला आहे. पहिल्या 5 मॅचमध्ये त्यानं 9 च्या सरासरीनं 45 रन केले. यापैकी पहिल्या 3 मॅचमध्ये त्यानं खराब शॉट्स मारत विकेट फेकली. मॉर्गनच्या चुकीचा फटका टीमला बसला. विशेषत: मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (Mumbai Indians) मॅचमध्ये मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना मॉर्गननं फेकलेली विकेट मॅचचा टर्निंग पॉईंट ठरली (Morgan Trouble for KKR)

रसेल कधी लवकर येणार?

आंद्रे रसेलबद्दल काहीही वाचण्यापूर्वी सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो पाहा

जगातील कोणताही बॅट्समन असो, तो कितीही फॉर्मात असू दे त्याला देखील स्थिरावण्यासाठी काही वेळ लागतो. केकेआरची टीमच्या आंद्रे रसेलवर सर्वात जास्त अवलंबून आहे, तो देखील या नियमाला अपवाद नाही. विशेषत: रसेल आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी या वर्षात (2021) एकही मॅच खेळलेला नव्हता. त्यामुळे तर मॉर्गननं विशेष खबरदारी घेणं आवश्यक होतं.

दहाव्या ओव्हरनंतर जेंव्हा पहिली विकेट जाईल त्यावेळी रसेल मैदानात उतरला पाहिजे. हे आजवर किमान 10 हजार वेळा बोलून झालं आहे. मॉर्गन या स्पर्धेत काय करतोय? आरसीबी विरुद्ध 205 रनचा पाठलाग करत असताना 5 विकेट्स गेल्यानंतर आणि शेवटच्या 6 ओव्हरमध्ये 15 चा रनरेट आवश्यक असताना रसेल बॅटींगला आला.

सीएसके विरुद्ध त्यानं वेगवान हाफ सेंच्युरी झळकावली. वानखेडेचं बॅटींगला मदत करणारं पिच होतं. तरीही रसेल पुढच्या मॅचला सातव्या क्रमांकावरच बॅटींगला आला. सीएसके विरुद्धही त्याचा सातवा क्रमांकच ठरला होता. पण 5 विकेट्स लवकर गेल्यानं त्यालाही बरच आधी यावं लागलं, अन्यथा तो मॉर्गनच्या योजनेप्रमाणे शेवटच्या पाच-सहा ओव्हर्स (Morgan Trouble for KKR) शिल्लक असतानाच बॅटींगला आला असता.

IPL 2021 KKR: प्रयोग कमी केले तरी बरंच काम होईल!

मॉर्गन टीममध्ये का आहे?

आयपीएल टीमचा कॅप्टन विदेशी असेल तर तो डेव्हिड वॉर्नरसारखा हवा. तरच चार विदेशी खेळाडूतील एक जागा कॅप्टनसाठी वाया जात असेल तर ती टीम यशस्वी ठरु शकत नाही. मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्सचं तेच झालं. त्यांना ती चूक उमगली म्हणून त्यांनी यंदा स्टीव्ह स्मिथची हकालपट्टी केली.

केकेआरच्या टीममध्ये आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, लॉकी फर्ग्युसन आणि शाकिब अल हसन/ सुनील नरीन या पाचपैकी चार विदेशी खेळाडू हवेत. यापैकी रसेल अनफिट असेल तर बेन कटींग हा पर्याय आहे. याचाच अर्थ जो खेळाडू पहिल्या चार सोडा सहा विदेशी खेळाडूमध्येही बसत नाही, त्याला केकेआरनं कॅप्टन केलं आहे. तोच केकेआरचा कॅप्टन इऑन मॉर्गन केकेआर सध्या पॉईंट टेबलच्या सर्वात तळाशी असण्याचं मुख्य कारण (Morgan Trouble for KKR) आहे.  

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading