
क्रिकेट मैदानात खेळ सुरु असताना दोन खेळाडूंमध्ये कधी-कधी शाब्दिक चकमक (Sledging) होते. या वादावादीचं रुपांतर काही वेळा शारीरिक झटापटीमध्ये झालेलं आहे. ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’ या पुस्तकी वाक्याला तडा देणारे अनेक खेळाडू क्रिकेट विश्वात आहेत. क्रिकेटच्या मैदानात किळसवाणं वर्तन करण्यात एक बांगलादेशी (Bangladesh) खेळाडू नेहमीच आघाडीवर असतो. त्या बांगलादेशी खेळाडूचं नाव आहे, मुशफिकर रहीम. (Mushfiqur Rahim)
मैदानात मॅच जिंकण्यापूर्वीच आनंद साजरा करणे, नागीन डान्स करणे किंवा भारत हरल्यावर कुत्सित ट्विट करत मनातील मळमळ व्यक्त करणे या प्रकाराबद्दल रहीम सर्वांना माहिती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा काळ घालवल्यानंतरही त्याच्यात अजूनही शहाणपण आलेलं दिसत नाही.त्यानं नुकताच भर मैदानात सहकारी खेळाडूला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मस्तवालपणाचा ताजा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
( वाचा : आफ्रिदी क्वारंटाईन न होताच श्रीलंकेत मॅच खेळला कारण…
काय घडला प्रकार?
बांगलादेशमध्ये सध्या बंगबंधू T20 कप (Bangbandhu T20 Cup) स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या एलिमिनेटरमध्ये हा सर्व प्रकार घडला. बेक्सिमो ढाका (Beximco Dhaka) आणि फॉर्च्यून बारिशाल (Fortune Barishal) या टीममध्ये ही मॅच सुरु होती. त्यावेळी एक कॅच पकडताना रहीम आणि त्याचा सहकारी नासुम अहमद (Nasum Ahmed) यांची धडक होणार होती. रहीमनं कॅच पकडला पण त्यानंतर त्याचा संयम सुटला. त्यानं भर मैदानातच अहमदवर हात उगारला. तो आता अहमदच्या थोबाडीत मारणार असं वाटत होतं, मात्र त्यानं हात खाली घेतला. रहीमच्या वर्तनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मुशफिकर रहीम हा बंगबंधू टी 20 स्पर्धेत ढाक्याच्या टीमचा कॅप्टन आहे. तसंच तो बांगलादेशचा देखील एक सीनिअर खेळाडू आहे. ‘तो अशा उद्दाम वर्तणुकीतून तो नव्या खेळाडूंसमोर काय आदर्श ठेवणार?’ असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जात आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.
You must be logged in to post a comment.