फोटो – ट्विटर

सुनील गावसकर (Suni Gavaskar) म्हणजे गेल्या पाच दशकांपासून भारतीय क्रिकेटचा मुख्य चेहरा. त्यांनी करियरच्या वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) वेस्ट इंडिजविरुद्ध भरपूर रन्स केले. भारतीय टीमला अनेक टेस्टमध्ये वाचवलं. सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड केला. योग्य वेळी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते क्रिकेट समालोचन आणि स्तंभलेखनामध्ये व्यस्त आहेत. भारतीय क्रिकेटच्या या महान तपस्वीच्या मताला आजही क्रिकेट विश्वात मोठी किंमत आहे.

‘नोटबुक’ शैलीत क्रिकेट खेळणाऱ्या गावस्कर यांचे मैदानातील वर्तन हे नेहमीच आचारसंहितेच्या पुस्तकाला साजेसे असे. क्रिकेट करियरमध्ये फक्त एकदा 1981 साली गावसकर यांचा भर मैदानात पारा चढला होता. संतापलेल्या गावस्कर यांनी त्या दिवशी जवळपास स्वत:बरोबरच भारतीय टीमलाही टेस्ट मॅचमधून बाहेर काढलं होतं. भारतीय विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरी टेस्ट मेलबर्नमध्ये (Melbourne) होत आहे. त्यानिमित्ताने जवळपास चार दशकांपूर्वी घडलेल्या त्या प्रसंगाला उजाळा देणे योग्य ठरेल.

( वाचा : Explained: विराट कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये आर. अश्विनवर खरंच अन्याय झाला आहे का? )

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्या सीरिजमध्ये गावसकर यांचा फॉर्म हरपला होता. मेलबर्नमधील दुसऱ्या आणि सीरिजमधील शेवटच्या इनिंगपूर्वीच्या पाच इनिंगमध्ये त्यांनी 0,10,23 5 आणि 10 असे फक्त 48 रन्स केले होते. सिडनी टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मात्र गावस्कर नेहमीच्या शैलीने खेळत होते. गावसकर 70 पर्यंत पोहचले होते. ते आता सेंच्युरी करणार असाच सर्वांना अंदाज होता. त्याचवेळी डेनिस लिलीच्या एका बॉलवर गावस्कर LBW असल्याचा निर्णय अंपायर रेक्स व्हाईटहेड यांनी दिला.

गावसकर यांनी त्या निर्णयावर तात्काळ नाराजी व्यक्त केली. बॉल बॅटला लागून पॅडला लागल्याचा त्यांचा दावा होता. त्यांनी तात्काळ तसे मत अंपायरकडे नोंदवले. भारतीय खेळाडूंना त्या सीरिजमध्ये सातत्याने वादग्रस्त आऊट देणारे अंपायर रेक्स त्यांच्या निर्णयावर ठाम होते. रागाने धुमसत असलेले गावसकर परतत असतानाच ‘चेतन चौहानलाही सोबत घेऊन जा’ अशी शेरेबाजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने केली.

( मोठी बातमी : मोठी बातमी: ऋद्धीमान साहाचे टेस्ट करियर होणार समाप्त? )

ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या शेरेबाजीनंतर गावस्कर आणखी भडकले. त्यांनी त्यांचा जोडीदार चेतन चौहानला (Chetan Chauhan) तात्काळ स्वत:सोबत बाहेर येण्याचा आदेश दिला. चौहान कॅप्टनचा आदेश मानत परत येऊ लागले. त्यावेळी भारतीय टीमचे मॅनेजर असलेल्या शहीद दुर्रानी आणि बापू नाडकर्णी जोडीनं तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं.

दुर्रानी-नाडकर्णी जोडी बाऊंड्री लाईनच्या जवळ आली. त्यांनी चेतन चौहानला मैदानात थांबण्याचा आदेश दिला. दिलीप वेंगसरकर मैदानात उतरले आणि त्यांनी चौहान सोबत पुढे खेळ सुरु केला. भारतीय टीम व्यवस्थापनाने तात्काळ हस्तक्षेप केला नसता तर भारतीय टीमवर गंभीर कारवाई झाली असती. पुढे कपिल देवच्या भन्नाट स्पेलमुळे भारताने ती टेस्ट जिंकली. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज 1-1 अशी बरोबरीत सोडवली.

( वाचा : क्रिकेटमधील मोजकेच दिवस शिल्लक असल्याची डेव्हिड वॉर्नरची कबुली! )

‘मेलबर्नमधील वॉकआऊट घटनेचा मला आजही खेद वाटतो’ अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी त्या घटनेवर काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती.  

गावसकर यांचा वॉक आऊट व्हिडिओ पाहा

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: