चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतील अनसोल्ड खेळाडू (Unsold Player) आहे. आयपीएलधील या अनसोल्ड खेळाडूची ‘प्राईस टॅग’ भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजमध्ये (IND vs AUS) नेहमीच अमुल्य असते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दोन टेस्ट सीरिज पुजाराच्या भक्कम खेळामुळेच भारताने जिंकल्या आहेत. विराट कोहलीला रोखण्यासाठी विशेष अभ्यास करुन आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला पुजाराचा पेपर नेहमीच अवघड गेला आहे.

चेतेश्वर पुजाराच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सातत्यपूर्ण खेळाची सुरुवात 2016-17 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपासूनच झाली. बंगळुरु टेस्टमध्ये टीम इंडिया पिछाडीवर पडलेली असताना पुजाराने संयमी खेळ करत 87 रन्स काढले होते. रांची टेस्टमध्ये पुजारानं मॅरेथॉन खेळी करत डबल सेंच्युरी केली. त्यामुळे भारताला ती टेस्ट सीरिज जिंकता आली.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

टीम इंडियाचा तारणहार!

भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही संयमी पुजाराने टीमला तारले. सीरिजच्या पहिल्याच टेस्टमध्ये खराब सुरुवातीनंतर पुजारा त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं एका बाजूने उभा राहिला. भारताच्या 250 रन्सपैकी जवळपास निम्मे म्हणजे 123 रन्स पुजाराचे होते. 6 तास 16 मिनिटे बॅटिंग करत 246 बॉल्समध्ये पुजाराने ती संयमी खेळी केल्यामुळेच भारताला पहिली टेस्ट जिंकून आघाडी घेता आली होती.

ॲडलेडप्रमाणे मेलबर्न आणि सिडनी टेस्टमध्येही पुजाराने सेंच्युरी झळकावली होती. यापैकी मेलबर्न टेस्ट भारताने जिंकली. तर सिडनी टेस्टमध्ये पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळला. पर्थमध्ये पुजाराला सेंच्युरी झळकावता आली नव्हती. त्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियातील एकाच टेस्ट सीरिजमध्ये तीन किंवा त्यापेक्षा जास्त सेंच्युरी झळकावणारा पुजारा हा विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांच्यानंतरचा तिसराच भारतीय आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मागील दोन टेस्ट सीरजमधील पुजाराचे रन्स

इनिंग14
रन्स863
सरासरी66.38
सर्वोच्च202
100/506/1

डेव्हिड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथच्या समावेशामुळे यंदा ऑस्ट्रेलियाची टीम मजबूत झाली आहे. भारताकडून रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल अनिश्चितता आहे. विराट कोहली एका टेस्टनंतर परत जाणार आहे. त्यामुळे भारतीय बॅटिंगचं ओझं यंदा सर्वस्वी पुजाराच्या खांद्यावर असेल. तो हे ओझे पेलण्यात किती यशस्वी होतो यावर भारताची या सीरिजमधील वाटचाल अवलंबून असणार आहे.

( वाचा : आकडे बोलतात; भारताच्या विजयात स्टीव्हन स्मिथ ठरणार मोठा अडसर! )

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: