फोटो – न्यूज लिमिटेड

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पहिली टेस्ट ॲडलेडमध्ये (Adelaide) होणार आहे. याच मैदानावर 2008 साली भारत-ऑस्ट्रेलिया सीरजमधील चौथी आणि शेवटची टेस्ट झाली होती. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज विकेटकिपर-बॅट्समन ॲडम गिलख्रिस्टची (Adam Gilchrist) ती शेवटची टेस्ट. गिलख्रिस्टला विजयी निरोप देण्याच्या निर्धाराने ऑस्ट्रेलियन टीम त्या टेस्टमध्ये उतरली होती. ऑस्ट्रेलियाच्या त्या निर्धाराच्या आड आला भारताचा धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवाग. (Virendra Sehwag)

ऑस्ट्रेलियन दौऱ्यापूर्वी सेहवाग फारसा फॉर्मात नव्हता. कॅप्टन अनिल कुंबळेनं (Anil Kumble) जोर दिल्यानं त्याचा टीममध्ये समावेश झाला. सेहवागनं या संधीचं सोनं केलं. सेहवाग ‘मॅचविनर’ बॅट्समन आहे, हे त्याने यापूर्वी वारंवार सिद्ध केले होते. मात्र, आपण ‘मॅच सेव्हर’ असल्याचंही त्यानं ॲडलेडमध्ये दाखवून दिलं.

( वाचा : जेंव्हा ‘द वॉल’ राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाची भिंत पाडली! )

तो सेहवाग ‘वेगळाच’ होता!

भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना 526 रन्स केले होते. त्याला ऑस्ट्रेलियाने 563 रन्स काढून उत्तर दिलं. आता पाचव्या दिवशी मॅच वाचवण्याची जबाबदारी भारतीय बॅट्समनवर होती. त्या टेस्टपूर्वी सेहवागची दुसऱ्या इनिंगमध्ये सरासरी होती 29. त्यामध्ये केवळ तीन हाफ सेंच्युरींचा समावेश होता. ॲडलेडमध्ये मात्र वेगळाच सेहवाग उतरला होता. त्याने नैसर्गिक शैलीला मुरड घालत जवळपास सहा तास किल्ला लढवला.

राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण या भारतीय क्रिकेटच्या चार दिग्गजांनी मिळून फक्त 54 रन्स केले. सेहवागनंतर महेंद्र सिंह धोनीनं भारताकडून सर्वात जास्त 20 रन्स काढले होते. प्रमुख बॅट्समन्सच्या या निराशाजनक खेळानंतरही सेहवागनं ऑस्ट्रेलियाला विजय मिळवू दिला नाही.

( वाचा : मुंबईकर अजित आगरकरच्या भन्नाट स्पेलपुढे कांगारुंनी पत्कारली होती शरणागती! )

सेहवागनं धोकादायक ब्रेट ली ला शांतपणे खेळून काढलंच. त्याचबरोबर सायमंड्स आणि मायकल क्लार्क या बॉलर्सविरुद्ध धोका पत्कारला नाही. सायमंड्स – क्लार्कच्या 57 बॉल्समध्ये त्याने फक्त 37 रन्स काढले होते.

पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या सेहवागने हाफ सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी 78 तर सेंच्युरी पूर्ण करण्यासाठी 123 बॉल्स घेतले. अखेर 236 बॉल खेळून 151 रन्सवर सेहवाग आऊट झाला त्यावेळी भारत ॲडलेड टेस्ट हरणार नाही हे स्पष्ट झाले होते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: