फोटो – ट्विटर, न्यूज 24

गेली दोन वर्ष जगाला वेठीस धऱणाऱ्या कोरोना व्हायरसनं 2021 च्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. युरोपीयन देशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढला आहे. जर्मनीत परिस्थिती गंभीर झाली आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट (New Covid19 Variant) आढळला आहे. भारतासाठी काळजीची बाब म्हणजे या गंभीर परिस्थितीमध्ये आपले क्रिकेटपटू सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत.

आंतरराष्ट्रीय सीरिज रद्द

नेदरलँडची टीम सध्या वन-डे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. दोन्ही देशांमध्ये 3 वन-डे मॅचची सीरिज नियोजित आहे. दक्षिण आफ्रिकेतील गंभीर परिस्थितीमुळे New Covid19 Variant)  त्यांनी पहिल्या वन-डे मॅचनंतर पुढील सीरिज रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतू 3 डिसेंबरपर्यंत मायदेशी जाण्यासाठी विमान नसल्यानं नेदरलँडची टीम आफ्रिकेतच थांबणार आहे.

भारतीय टीम अडकली

टीम इंडिया A टीम देखील सध्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. दक्षिण आफ्रिका सोबत त्यांची पहिली अनधिकृत टेस्ट मॅच सुरू आहे. त्याचबरोबर आणखी दोन अनधिकृत टेस्ट मॅच नियोजित आहेत. प्रियांक पाचळच्या कॅप्टनसीमध्ये खेळत असलेल्या इंडिया A टीममध्ये पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, इशान किशन, दीपक चहर, राहुल चहर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असलेल्या क्रिकेटपटूंसह देशांतर्गत क्रिकेटमधील बडे खेळाडू आहेत.

ब्लोमफोंटेनमध्ये दोन्ही देशांमधील पहिली अनधिकृत टेस्ट सुरु आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं आफ्रिकेतील परिस्थितीवर माहिती देताना सांगितलं की, ‘आम्ही इथं चार्टर्ड विमानानानं आलो आहोत. त्यामुळे आम्हाला क्वारंटाईन राहावं लागलं नाही. आपली टीम बायो-बबलमध्ये आहे. कोरोनाचा धोका आणखी वाढल्यानंतर (New Covid19 Variant) दक्षिण आफ्रिकेच्या मेडिकल टीमसोबत आम्ही चर्चा केली. इंडिया ए आणि दक्षिण आफ्रिका ए मध्ये सुरू असलेल्या मॅचपासून व्हायरसचा उद्रेक झालेली शहरं दूर आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असा दिलासा आफ्रिकन मेडिकल टीमनं आम्हाला दिला आहे.’ असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कोहली-शास्त्रीनं नाकारलेल्या भारतीय खेळाडूनं दक्षिण आफ्रिकेत झळकावली सेंच्युरी

टीम इंडियाच्या दौऱ्याचं काय होणार?

दक्षिण आफ्रिकेला प्रवासासाठी ब्रिटननं रेड लिस्ट देशांच्या यादीत टाकले आहे. त्याचबरोबर भारत सरकारने देखील आफ्रिकेतून येणाऱ्या विमानातील प्रत्येक प्रवाशाची काटेकोर तपासणी करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत. टीम इंडिया 8 किंवा 9 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.

भारतीय टीमनं यापूर्वी कोरोना संकटाचं कारण देत इंग्लंड दौऱ्यातील पाचवी टेस्ट खेळण्यास नकार दिला होता. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियानं देखील यावर्षी त्यांचा दौरा रद्द केला होता. दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर भागात नव्या व्हायरसचा (New Covid19 Variant) प्रसार झपाट्यानं होत आहे. या भागातील जोहान्सबर्ग आणि प्रिटोरीया या शहरात टीम इंडियाच्या मॅच होणार आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या या दौऱ्याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND vs ENG: विस्तवाशी खेळल्यानं बसला चटका, टीम इंडियात शिरला कोरोना

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: