
न्यूझीलंडनं एजबस्टन टेस्टच्या चौथ्या दिवशी इंग्लंडचा 4 विकेट्सनं पराभव केला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं 1999 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचा रेकॉर्ड केला (New Zealand Creates Record) आहे. 22 वर्षांपूर्वी ऑल राऊंडर ख्रिस केन्स या विजयाचा हिरो होता. त्याच्याच वाढदिवशी न्यूझीलंडनं हा रेकॉर्ड केला. तर दुसरिकडे इंग्लंडनं 2014 नंतर पहिल्यांदाच मायदेशात टेस्ट सीरिज गमावली आहे.
चौथ्या दिवशीच औपचारिकता पूर्ण
इंग्लंडकडे तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडकडे दुसऱ्या इनिंगमध्ये जेमतेम 37 रनची आघाडी होती. ट्रेंट बोल्टनं (Trent Boult) चौथ्या दिवसाच्या पहिल्याच बॉलवर ओली स्टोनची विकेट घेत इंग्लंडला ‘ऑल आऊट’ केले. न्यूझीलंडनं 38 रनची औपचारिकता 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केली. त्यांचा काळजीवाहू कॅप्टन टॉम लॅथम (Tom Latham) याने नाबाद 23 रन काढले. या खेळीच्या दरम्यान त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 4 हजार रनचा टप्पाही पूर्ण केला.
इंग्लंडनं ही टेस्ट तिसऱ्या दिवशीच गमावली होती. पहिल्या इनिंगमध्ये 85 रनवर पिछाडीवर असलेल्या इंग्लंडची दुसऱ्या इनिंगमध्ये अवस्था 5 आऊट 58 अशी झाली होती. इंग्लंडकडून ओली पोप (23) आणि मार्क वूड (29) या दोघांनीच 20 पेक्षा जास्त रन केले. अखेर लोअर ऑर्डरच्या बॅट्समननं चिवट खेळ करत इंग्लंडचा पराभव चौथ्या दिवसापर्यंत ढकलला.
वाढदिवस स्पेशल : क्रिकेट विश्वाने दुर्लक्ष केलेला बेस्ट ऑल राऊंडर!
न्यूझीलंड नंबर 1
न्यूझीलंडनं या टेस्टसाठी कॅप्टन केन विल्यमसनसह (Kane Williamson) 6 बदल केले होते. त्यांनी अनेक राखीव खेळाडूंना या टेस्टमध्ये संधी दिली, तरी यजमान इंग्लंडला फक्त 10 सत्रामध्ये पराभूत केले. या विजयाबरोबरच न्यूझीलंडनं अनेक रेकॉर्ड्स केले आहेत.
न्यूझीलंडची टीम आता आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये टीम इंडियाला (Team India) मागे टाकून नंबर 1 बनली (New Zealand Creates Record) आहे. टीम इंडियाचे 121 पॉईंट्स असून या विजयानंतर न्यूझीलंडचे 123 पॉईंट्स झाले आहेत. त्याचबरोबर 1999 नंतर पहिल्यांदाच न्यूझीलंड इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज जिंकली आहे. यापूर्वी 2015 साली इंग्लंडमध्ये दोन देशांमधील टेस्ट सीरिज 1-1 ने बरोबरीत सुटली होती.
श्रीलंकेनं 2014 साली पराभूत केल्यानंतर इंग्लंडची टीम मायदेशात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज हरली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडनं मागील चार टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंड विरुद्ध पराभूत न होण्याचा रेकॉर्ड केला आहे.
विल्यमसन किंवा बोल्ट नाही तर ‘या’ खेळाडूचा आहे टीम इंडियाला सर्वात जास्त धोका
टीम इंडियाची ‘टेस्ट’
इंग्लंडला पराभूत करुन आत्मविश्वास उंचावलेली न्यूझीलंडची टीम आता वर्ल्ड टेस्ट सीरिजच्या फायनलमध्ये टीम इंडियाशी लढणार आहे. दोन देशांमधील फायनल 18 जून पासून सुरू होत आहे. न्यूझीलंडला या सीरिजमध्ये डेवॉन कॉनवे (Devon Conway) हा भक्कम ओपनर मिळाला आहे. त्याने टेस्ट पदार्पणातच ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार मिळवत टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे.
न्यूझीलंडचे सर्वच फास्ट बॉलर्सना या सीरिजमध्ये फॉर्म गवसलाय. ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नर, मॅट हेन्री, काईल जेमीसन हे चार फास्ट बॉलर्स टीम इंडियाची ‘टेस्ट’ पाहण्यासाठी सज्ज असतील. त्यामुळे टीम इंडियाला फायनल जिंकण्यासाठी जोरदार तयारी करुन उतरावे लागेल.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.