फोटो – ट्विटर/@BLACKCAPS

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 101 रन्सनं पराभव केला. अनिश्चित खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानच्या (Pakistan) टीमनं चौथ्या इनिंगमध्ये अचानक कमबॅक करत न्यूझीलंडच्या सहज विजयावर जवळपास पाणी टाकलं होतं. मॅच संपण्यास फक्त 27 बॉल्स शिल्लक असताना मिचेल सँटनरनं (Mitchell Santner) पाकिस्तानचा 11 वा बॅट्समन नसीम शाहला आऊट करत टीमला विजय मिळवून दिला.

पाकिस्तानचं कमबॅक

पाकिस्तानसमोर चौथ्या इनिंगमध्ये 373 रन्सचं टार्गेट होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था 4 आऊट 75 अशी झाली होती. त्यानंतर फवाद आलम (Fawad Alam) आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) या जोडीनं चिवट प्रतिकार केला. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 165 रन्सची पार्टरनरशिप केली. यावेळी त्यांनी तब्बल पाच तास मैदान सांभाळत न्यूझीलंडच्या बॉलर्सना त्रासून सोडलं होतं.

( वाचा : न्यूझीलंडचा नवा ‘रेकॉर्ड मास्टर’ ग्लेन फिलिप्स आहे तरी कोण? )

 फवादनं 236 बॉल्समध्ये 102 रन्स काढले. फवादनं तब्बल 11 वर्षांनी इंग्लंड विरुद्धच्या सीरिजसाठी पाकिस्तानच्या टीममध्ये केलं आहे. चौथ्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्यास अवघड परिस्थिती असताना त्यानं सेंच्युरी झळकावली. त्याला पहिल्या इनिंगमध्ये 71 रनची खेळी करणारा काळजीवाहू कॅप्टन रिझवाननं चांगली साथ दिली. रिझवाननं 60 रन्स काढण्यासाठी 191 बॉल्स खेळून काढत बॉलर्सच्या संयमाची ‘टेस्ट’ घेतली.

रिझवान आऊट झाल्यानंतर फवादही लगेच परतला. त्यानंतरही पाकिस्तानच्या तळाच्या बॅट्समनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या जोडीनं आठ ओव्हर्स खेळून काढतं मॅच ड्रॉ करण्याची आशा वाढवली होती. मात्र सँटनरनं शेवटची विकेट घेत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

न्यूझीलंड पहिल्यांदाच नंबर 1

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनला (Kane Williamson) मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. विल्यमसननं न्यूझीलंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 129 रन्सची खेळी केली होती.

( वाचा : Explained: मेलबर्न टेस्टमधील भारताचा विजय का खास आहे? )

न्यूझीलंडची मायदेशातील हा सलग पाचवा टेस्ट विजय आहे. या विजयाबरोबरच त्यांची टीम पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटच्या रँकिंगमध्ये पहिल्या नंबरवर धडक मारली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: