फोटो – ट्विटर

आयपीएल (IPL) स्पर्धेवर सध्या कोरोनाचं सावट पसरलं आहे. देशात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांमुळे आयपीएलमधील सुरक्षित बायो-बबलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंमध्ये अस्वस्थता आहे. विशेषत: विदेशी खेळाडूंमधील अस्वस्थता आता बाहेर येत आहे. मागील दोन दिवसांमध्ये तीन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथ (Steve Smith)  डेव्हिड वॉर्नर (David Warner) यांच्यासह आयपीएल स्पर्धेत सहभागी असलेले 30 ऑस्ट्रेलियन्स परत जाण्याच्या तयारीत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या खेळाडूंबद्दल (New Zealand Players in IPL) एक अपडेट माहिती आहे.

न्यूझीलंड क्रिकेट प्लेयर्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हेथ मिल्स (Heath Mills) यांनी याबाबत त्यांच्या देशातील खेळाडूंची भूमिका स्पष्ट केली आहे. “न्यूझीलंडचे क्रिकेटपटू सध्या घडत असलेल्या घडामोडींबद्दल चिंताग्रस्त आहेत. मात्र यापैकी कोणत्याही खेळाडूची मायदेशी परत येण्याची इच्छा नाही. सध्या ते बायो-बबलमध्ये समाधानी आहेत.” असं मिल्स यांनी स्पष्ट केलं आहे.

यंदाची आयपीएल स्पर्धा ही सहा शहरांमध्ये होत आहे. कोणत्याही टीमला त्यांच्या होम ग्राऊंडवर खेळण्याचा फायदा मिळणार नाही. पण, प्रत्येक टीम ‘प्ले ऑफ’ पूर्वी चार शहरांमध्ये खेळणार आहे. एका शहरामधून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी खेळाडूंना विमान प्रवास करणे भाग आहे. हा विमान प्रवास आव्हानात्मक असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केलीय.

BCCI समोर मोठं संकट! वॉर्नर, स्मिथसह 30 ऑस्ट्रेलियन परत जाण्याच्या तयारीत

“सध्या एका शहरातील हॉटेलमध्ये चार टीम आहेत. या सर्व टीम हॉटेलमध्ये लॉक आहेत. मात्र जेंव्हा एक टीम दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी निघते त्यावेळी सर्वांना PPE किट घालावे लागते. त्या प्रवासात सर्वात जास्त धोका आहे, सध्या ते काळजीत असले तरी कुणीही परत येण्याची इच्छा (New Zealand Players in IPL) व्यक्त केलेली नाही,’’ असं मिल्स यांनी स्पष्ट केले आहे.

यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे (RR) लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) आणि अ‍ॅण्ड्रयू टाय (Andrew Tye) तर  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (RCB) केन रिचर्डसन (Kane Richardson) आणि अ‍ॅडम झम्पा (Adam Zampa) यांनी बायो-बबलमध्ये राहण्यास असमर्थता व्यक्त करत या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य ऑफ स्पिनर आर. अश्विन (Ravichandran Ashwin) याने देखील जवळच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं सांगत आयपीएलमधून सध्या ब्रेक घेतलाय. आयपीएल स्पर्धेतून कोरोनाच्या कारणामुळे बाहेर पडलेला अश्विन हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंच्या (New Zealand Players in IPL) भूमिकेनं बीसीसीआय आणि क्रिकेट फॅन्सना दिलासा मिळाला आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: