तालिबान या दहशतवादी संघटनेचा मित्रदेश असलेल्या पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास न्यूझीलंडनं टॉस होण्यास काही मिनिटे बाकी असताना (New Zealand Pulled out from Pakistan Tour) नकार दिला.त्यानंतर इंग्लंडच्या टीमनं पाकिस्तानचा दौरा रद्द (England cancel Cricket tour of Pakistan)  केला आहे. या दोन घटनांमुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली आहे. त्याचबरोबर ‘पाकिस्तानात कुणीच सुरक्षित नाही’  ही चर्चा देखील जगभर सुरू झाली आहे. ही चर्चा दाबण्यासाठी पाकिस्तान सरकारनं त्यांचं भारतविरोधी कार्ड बाहेर काढलं. भारतीय रॅपर ओम प्रकाश मिश्रा (Indian Rapper Om Prakash Mishra)  हा न्यूझीलंडचा दौरा रद्द करण्याचा मास्टरमाईंड असल्याचं पाकिस्तान सरकानं जाहीर केलं. त्यामुळे आता जगभर पाकिस्तानचं हसं होत आहे.

पाकिस्तानचा आरोप काय?

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhry) यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी न्यूझीलंड दौरा कॅन्सल होण्यामागे कसं भारतीय कनेक्शन आहे, हे जगाला आणि विशेषत:  पाकिस्तानच्या जनतेला सांगण्याचा प्रयत्न केला.

तालिबान मित्र पाकिस्तानची पुन्हा नाचक्की, न्यूझीलंडनंतर इंग्लंडनंही केला दौरा रद्द

भारतामध्ये मुंबईत राहणाऱ्या ओम प्रकाश मिश्रा (Indian Rapper Om Prakash Mishra) या व्यक्तीनं फेक आयडी तयार करुन न्यूझीलंडचा बॅट्समन मार्टिन गप्टीलच्या पत्नीला धमकीचा ईमेल पाठवला. ज्या मोबाईलमधून हा ईमेल पाठवण्यात आला तो मोबाईल ऑगस्ट 2019 मध्ये भारतामध्ये लाँच झाला आहे, आणि 25 सप्टेंबर 2019 रोजी तो अ‍ॅक्टीव्ह झाला. तो मोबाईल एकाच व्यक्तीनं वापरला आहे. ती व्यक्तीमध्ये मुंबईत राहणारी ओम प्रकाश मिश्रा असावी असा आरोप चौधरी यांनी केला.

 हमजा आफ्रिदी (Hamza Afridi) या फेक नावानं VPN चा वापर करत हा ईमेल पाठवण्यात आला. पाकिस्तानचे नाव जगात बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक हे नाव वापरण्यात आले, असा दावाही चौधरी यांनी केला. यावेळी चौधरी यांनी जे कागद दाखवले त्यामध्ये ओम प्रकाश मिश्राचा त्याच्या गाण्यातील एक फोटो देखील होता.

VIDEO: पाकिस्तान घेणार इंग्लंड आणि न्यूझीलंडचा बदला! PCB अध्यक्षांची घोषणा

कोण आहे मिश्रा?

पाकिस्तान सरकारनं न्यूझीलंड दौरा रद्द करण्याचं बिल ज्या ओम प्रकाश मिश्रावर (Indian Rapper Om Prakash Mishra) फोडलं आहे. तो एक रॅपर आहे. त्याचं ‘बोल ना आंटी आऊं क्या’ (Bol na aunty aaun kya)  हे एक अतिशय वाह्यात गाणं आहे.

या वाह्यात गाण्यामुळे तो काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर गाजला होता. आता या मिश्राला पाकिस्तान सरकारनं थेट न्यूझीलंड दौरा रद्द करण्यासाठी जबाबदार धरलं आहे. त्याचं नाव आणि फोटो पाकिस्तानच्या मंत्र्यांनी घेताच त्याचवरील अनेक मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांना हा दौरा रद्द करु नये म्हणून विनंती केली होती. ‘आमच्याकडं जगातील सर्वात कार्यक्षम गुप्तचर संघटना’ आहे, असा इम्रान खान, पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांच्यासह पाकिस्तान सरकारमधील सर्वांचा दावा होता. या बलाढ्य गुप्तचर यंत्रणांनी एका भारतीय रॅपरला (Indian Rapper Om Prakash Mishra) हा दौरा रद्द करण्यासाठी जबाबदार धरलं आहे. पाकिस्तानच्या तथाकथित ‘बलाढ्य गुप्तचर यंत्रणांचं’ पितळ या निमित्तानं पुन्हा उघडं पडलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: