फोटो – ट्विटर/ @cricketcomau

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) गंभीर कोव्हिड परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलियानं (Australia) आफ्रिका दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. World Test Championship अंतर्गत होणाऱ्या या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात तीन टेस्ट मॅचची सीरिज होणार होती. आता ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेतून माघार घेतल्यानं World Test Championship गाठण्याची त्यांची आशा जवळपास संपुष्टात आली आहे. ऑस्ट्रेलियानं या स्पर्धेतून जवळपास आऊट होण्यात त्यांचा ‘कॅप्टन आहे, म्हणून टीममध्ये आहे’  अशा टीम पेनची (Tim Paine) एक चूक कारणीभूत ठरली आहे.

न्यूझीलंड फायनलमध्ये दाखल

ऑस्ट्रेलियानं हा दौरा रद्द करताच न्यूझीलंडची टीम World Test Championship च्या फायनलमध्ये दाखल झाली आहे. न्यूझीलंडचे सध्या 70 परसेंटेज पॉईंट आहेत. या फायनलचे अन्य दोन दावेदार असलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENF) यांच्यातील चार टेस्ट मॅचची सीरिज 5 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या सीरिजनंतर फायनलमधील दुसरी टीम निश्चित होईल

भारताला किती संधी?

भारत सध्या या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला (Team India) सीरिज किमान 2-1 अशा फरकानं जिंकली पाहिजे. या सीरिजमधील आणखी मोठा विजय भारतीय टीमचे फायनलमधील स्थान आणखी पक्कं करणार आहे.

इंग्लंडला संधी आहे का?

पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या फायनल गाठण्याच्या आशा अजूनही कायम आहेत. इंग्लंडला त्यासाठी भारताविरुद्ध होणारी सीरिज 3-0, 3-1 किंवा 4-0 अशा मोठ्या फरकानं जिंकली पाहिजे.

( वाचा : IND vs ENG: स्वातंत्र्य, सन्मान आणि स्वामित्वाची 89 वर्षांची लढाई! )

ऑस्ट्रेलियाला टीम PAINE !

ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धची सीरिज गमावण्यापेक्षाही स्लो ओव्हर रेटचा फटका बसला आहे. टीम पेनच्या टीमनं भारताविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (Boxing Test) संथगतीनं बॉलिंग केली. त्यामुळे त्यांचे चार पॉईंट कमी झाले. ते पॉईंट कमी झाले नसते तर कदाचित प्रति विकेट रनच्या गुणोत्तराच्या (Runs per wicket ratio)  जोरावर ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडविरुद्ध बाजी मारली असती, कारण ऑस्ट्रेलियाचे हे गुणोत्तर 1.39 असून न्यूझीलंडचे 1.28 आहे. खेळाडूकडून ठराविक मुदतीमध्ये बॉलिंग करुन घेणं हे कॅप्टनचं काम असतं. पण ज्या टीम पेननं टेस्ट क्रिकेटमध्ये आजवर एकही शतक लगावलं नाही. ज्यानं भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये अनेक DRS चुकीचे घेतले. भारतीय खेळाडूंविरुद्ध स्लेजिंग केलं आणि ब्रिस्बेनमध्ये टीमच्या पराभवानं थोबाडावर पडला. त्या पेनच्या गौरवशाली (!!!) कारकीर्दीत  निर्धारित कालावधीमध्ये निश्चित केलेल्या ओव्हर्सही संपवता येत नाही हे आणखी एक पान जोडलं गेलं आहे.  

आता चमत्काराची आशा

भारत – इंग्लंड सीरिज बरोबरीत सुटली किंवा इंग्लंडनं ही सीरिज 1-0, 2-0, 2-1 अशा फरकानं जिंकली. अथवा भारतानं ही सीरिज 1-0 अशा फरकानं जिंकली तरच ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेची फायनल गाठण्याची संधी आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: