फोटो – Blackcaps

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (New Zealand vs West Indies) यांच्यात वेलिंग्टनमध्ये ( Wellington) झालेली दुसरी टेस्ट न्यूझीलंडनं एक इनिंग आणि 12 रन्सनं जिंकली. त्याचबरोबर दोन टेस्ट मॅचची सीरिज देखील त्यांनी 2-0 अशी जिंकली आहे. न्यूझीलंडच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाच्या (Team India) अडचणीत भर पडली आहे.

न्यूझीलंडचे या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीमध्ये (WTC ) 300 पॉईंट्स झाले आहेत. न्यूझीलंडनं 4 टेस्ट सीरिजमध्ये हे पॉईंट्स कमावले आहेत. चार टेस्ट सीरिजमध्ये झालेल्या 9 पैकी त्यांनी 5 टेस्ट जिंकल्या तर 4 मध्ये त्यांची टीम पराभूत झाली. न्यूझीलंडनं एकूण 62.50 च्या सरासरीनं हे पॉईंट्स मिळवले आहेत.

( वाचा : न्यूझीलंडचा नवा ‘रेकॉर्ड मास्टर’ ग्लेन फिलिप्स आहे तरी कोण? )

टीम इंडियाचे टेन्शन का वाढले?

न्यूझीलंडची आता पुढची टेस्ट सीरिज पाकिस्तानबरोबर होणार आहे. घरच्या मैदानावर होणारी ही सीरिज जिंकण्यासाठी न्यूझीलंड फेव्हरीट मानले जात आहे. न्यूझीलंडनं आगामी सीरिज देखील 2-0 नं जिंकली तर त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पाच सीरिजमधून 420 पॉईंट्स होतील.

न्यूझीलंडच्या या विजयी घौडदौडीचा थेट परिणाम टीम इंडियावर (Team India) होणार आहे. त्या परिस्थितीमध्ये भारताला उरलेल्या आठ टेस्टपैकी किमान पाच टेस्ट जिंकाव्या लागतील. अथवा चार टेस्टमध्ये विजय आणि तीन टेस्ट ड्रॉ अशी कामगिरी करावी लागेल. भारताच्या आगामी आठ टेस्ट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन बलाढ्य टीमसोबत आहेत.

आयसीसीच्या नियमांचा फटका

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम हे महिनाभरापूर्वी अचानक बदलण्यात आले आहेत. कोरोना व्हायरस (COVID19) मुळे या वर्षभरात अनेक टेस्ट सीरिज रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वात जास्त पॉईंट्स मिळवणाऱ्या दोन टीममध्ये फायनल न होता, सर्वात जास्त सरासरी असलेल्या दोन टीममध्ये फायनल घेण्याचा नियम आयसीसीने (ICC) महिनाभरापूर्वीच बनवला आहे. आयसीसीच्या या नियमांचा सर्वात मोठा फटका यापूर्वी सर्वात जास्त टेस्ट सीरिज खेळलेल्या टीम इंडियाला बसणार आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं देखील नव्या नियमांबाबत नाराजी व्यक्त केली होती.

( वाचा : विराट कोहली आयसीसीवर नाराज का आहे? )

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात 1 ऑगस्ट 2019 रोजी झाली. जून 2021 पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: