फोटो – ट्विटर, आयसीसी

न्यूझीलंड आणि बांगलादेश टीममध्ये (NZ vs BAN Test) माऊंट माउंगानुई (Mount Maunganui) येथील बे ओव्हल स्टेडियमवर पहिली टेस्ट सुरू आहे. बांगलादेशच्या बॅटरने न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सचा यशस्वी सामना करत 458 रन केल्या आणि 130 रनची निर्णायक आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशच्या फास्ट बॉलर्सने धारधार बॉलिंग केल्याने चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था 5 आऊट 147 रन (New Zealand in Trouble) झाली. न्यूझीलंडने 17 रनची लीड घेतली आहे. मात्र पाच विकेट्स गमावल्याने न्यूझीलंडची टीम बॅकफूटवर गेली आहे. पाचव्या दिवशी उरलेल्या 5 विकेट्स झटपट घेऊन न्यूझीलंडमध्ये पहिली टेस्ट जिंकण्याचा प्रयत्न बांगलादेशचा असेल

मेहंदी रंगली

तिसऱ्या दिवशी नाबाद असणाऱ्या यासिर अली (Yasir Ali) आणि मेहंदी हसन (Mehidy Hasan) यांनी बांगलादेशची लीड 100 पार नेली. आऊट होण्यापूर्वी मेहंदी हसन याने 88 बॉलमध्ये 47 रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. कायले जेमिसनच्या बॉलवर तो आऊट झाला.

कोरोनाग्रस्त टीमच्या मदतीला क्रीडा मंत्री मैदानात, रणजी टीममध्ये झाली निवड

मेहंदी बाद झाल्यानंतर न्यूझींलंडच्या बॉलर्सने बांगलादेशच्या लोअर ऑर्डरला 15 रनमध्ये आऊट केले. यासिर अलीने 26 रन केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने 4, वॅगनरने 3, साऊथीने 2 आणि जेमिसनने एक विकेट्स घेतली.

न्यूझींलड बॅकफूटवर

130 रनची लीड मोडून आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब (New Zealand in Trouble) झाली. ओपनर आणि कॅप्टन टॉम लेथम याचा खराब फॉर्म दुसऱ्या इनिंगमध्येही कायम राहिला. टस्कीन अहमदच्या बॉलर तो बोल्ड झाला. त्याने 14 रन केल्या. पहिल्या इनिंगमध्येही तो 1 रनवर आऊट झाला होता.

पुजारा आणि रहाणेला सलग बॉलवर आऊट करणारा ऑलिव्हर कोण आहे?

पहिली विकेट झटपट गमावल्यानंतर विल यंग आणि डेवॉन कॉनवे यांच्यात एक छोटी पार्टनरशीप झाली. मात्र कॉनवे 13 रन करून आऊट झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर आपली अखेरची टेस्ट सीरिज खेळणारा रॉस टेलर मैदानात उतरला.

रॉस टेलर (Ross Taylor) आणि विल यंग (Will Young) यांनी टीमला शंभरी ओलांडून दिली. यादरम्यान यंगने पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या इनिंगमध्येही हाफ सेंच्युरी पूर्ण केली. मात्र यानंतर तो 67 रनवर आऊट झाला.

बांगलादेशचे कमबॅक

चौथा दिवस संपण्याला तीन ओव्हर बाकी असताना बांगलादेशने नाट्यमय पद्धतीने कमबॅक (New Zealand in Trouble) केले. अकरावी टेस्ट खेळणाऱ्या इबादत हुसेन (Ebadot Hossain) याने मॅचचे चित्रच पालटून टाकले. त्याने 54 व्या ओव्हरमध्ये आधी विल यंग याला आऊट केले आणि 56 व्या ओव्हरमध्ये हेन्री निकोल्स आणि टॉम ब्लंडेल यांना आऊट करत न्यूझीलंडला पराभवाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले.

न्यूझीलंडची (New Zealand in Trouble) आता सर्व मदार अनुभवी रॉस टेलरवर आहे. टेलर सध्या 37 रनवर नाबाद आहे. त्याच्यासोबत रचिन रविंद्र (Rachin Ravindra) मैदानात आहे रविंद्रने टीम इंडियाविरुद्ध कानपूर टेस्ट वाचवण्यासाठी किल्ला लढवला होता. तशीच खेळी त्याला आता पुन्हा करावी लागेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: