न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealand vs Bangladesh) यांच्यातील दुसरी टेस्ट सध्या क्राईस्टचर्चमध्ये सुरू आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं मॅचवर पकड मिळवली आहे. न्यूझीलंडने पहिली इनिंग 6 आऊट 521 रनवर घोषित केली. त्यानंतर बांगलादेशला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 121 रनवर ऑल आऊट केले. न्यूझीलंडचा या टेस्टमधील कॅप्टन टॉम लॅथमने (Tom Latham) डबल सेंच्युरी झळकावली. त्याच्या आणि न्यूझीलंडचा नियमित कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याने झळकावलेल्या डबल सेंच्युरीमध्ये 5 जबरदस्त योगायोग (Latham and Williamson) आहेत.

टॉम लॅथमने बांगलादेश विरुद्ध 252 रनची खेळी केली. 2022 या कॅलेंडर वर्षातील ही पहिली डबल सेंच्युरी आहे. यापूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये 250 पेक्षा जास्त रन केन विल्यमसननं डिसेंबर 2020 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध केले होते. हेमिल्टनमध्ये झालेल्या त्या टेस्टमध्ये विल्यमसननं 251 रन काढले होते. विल्यमसन दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये लॅथम टेस्ट टीमची कॅप्टनसी सांभाळात आहे. टेस्ट क्रिकेटमधील शेवटच्या 250 रनच्या खेळीमध्ये जबरदस्त कनेक्शन आहे.

250 रन आणि 5 योगायोग

पहिला योगायोग म्हणजे टेस्ट क्रिकेटमधील 250 हून अधिक वैयक्तिक रन न्यूझीलंडमध्ये आणि न्यूझीलंडच्या बॅटरने केले आहेत. न्यूझीलंडच्या बॅटरने टीमची कॅप्टनसी करताना हा स्कोअर केला आहे, हा दुसरा योगायोग (Latham and Williamson) आहे.

OMG! कॅच तर सोडलाच त्याचबरोबर 1 बॉलमध्ये दिले 7 रन, बांगलादेशचा पराक्रम

तिसरा योगायोग तर आणखी भारी आहे. लॅथमने 34 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 252 रन केले. तर विल्यमसनने देखील 2020 साली 34 फोर आणि 2 सिक्ससह 251 रन काढले होते. हे साम्य इथेच थांबत नाही..

लॅथम आणि विल्यमसन यांनी सिक्स लगावत 250 रनचा टप्पा पूर्ण केला. त्याहून विशेष म्हणजे हे दोघेही 250 रनचा टप्पा ओलांडल्यानंतर पुढच्याच बॉलवर आऊट झाले. हा चौथा योगायोग आहे.

या दोन्ही खेळीतला पाचवा योगायोग (Latham and Williamson) देखील विश्वास बसणार नाही इतका सारखा आहे. लॅथम आणि विल्यमसन या दोन्ही कॅप्टनने स्वत: आऊट झाल्यानंतर बरोबर 19 बॉलनंतर इनिंग घोषित केली.

आणखी एक योग जुळणार

केन विल्यमसनच्या डबल सेंच्युरीमुळे न्यूझीलंडने वेस्ट इंडिज विरुद्धची टेस्ट एक इनिंग आणि 134 रनने जिंकली होती. या टेस्टमध्ये न्यूझीलंडने बांगलादेश विरुद्ध 404 रनची भक्कम आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडची मॅचवर घट्ट पकड झाली असून ही टेस्ट न्यूझीलंड जिंकण्याच्या मार्गावर आहे. त्य़ामुळे विल्यमसनप्रमणे लॅथमच्या 250 रनच्या खेळीनंतरही दणदणीत टेस्ट मॅच जिंकण्याचा आणखी एक योगायोग पूर्ण होण्याच्या मार्गावर (Latham and Williamson) आहे. 

आक्रमक, सकारात्मक आणि खेळाला पुढे नेणारा क्रिकेटपटू! 

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: