फोटो – ट्विटर

न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश (New Zealnd vs Bangladesh) यांच्या सीरिजमधील दुसरी आणि शेवटची टेस्ट सुरू झाली आहे. बांगलादेशनं या सीरिजमधील पहिली टेस्ट जिंकत त्यांच्या फॅन्ससह सर्व जगाला धक्का दिला आहे. आता त्यांना आणखी एक पाऊल पुढे टाकत न्यूझीलंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची ‘नू भूतो’ अशी संधी आहे. दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या बॉलर्सची जोरदार धुलाई झाली. त्याचबरोबर त्यांनी 1 बॉलमध्ये 7 रन (1 Ball 7 Runs) दिल्यानं टीमच्या फिल्डिंगचे जगभर हसे झाले.

Comedy of Errors

मॅचच्या दरम्यान खेळण्याच्या जोशात काही हास्यास्पद चूका करण्याची बांगलादेशच्या टीमची पंरपरा आहे. न्यूझीलंडला त्यांनी पहिल्या टेस्टमध्ये 8 विकेट्सनं पराभूत केले. त्यावेळी देखील रॉस टेलरच्या (Ross Taylor) बॅटला लागलेला बॉलवर टीमने फक्त LBW चे अपिल केले नाही, तर DRS घेत थर्ड अंपायरकडे अपिलही केले होते. त्यावेळी देखील बांगलादेश टीमचे हसे झाले होते.

दुसऱ्या टेस्टमध्ये बांगलादेशची टीम मोठ्या जोशात फिल्डिंगसाठी उतरली. त्यावेळी देखील त्यांना काही साध्या चुका (Silly Mistakes) टाळता आल्या नाहीत. यावेळी बांगलादेशच्या फिल्डरनं न्यूझीलंडच्या बॅटरचा कॅच सोडून त्याला जीवदान तर दिलेच. त्याचबरोबर 1 बॉलमध्ये 1,2, 3….6 नाही तर 7 रन दान करण्याचा पराक्रम (1 Ball 7 Runs)  केला.

Worst Review : बांगलादेशच्या टीमला झालं तरी काय! Video पाहून डोक्याला लावाल हात

नेमके काय झाले?

न्यूझीलंडच्या इनिंगमधील 26 व्या ओव्हरमध्ये हा अजब प्रकार घडला. पहिल्या टेस्टचा हिरो इबादत हुसेन (Ebadot Hossain) बॉलिंग करत होता. तर विल यंग (Will Young) स्ट्राईकवर होता. त्या ओव्हरचा शेवटचा बॉल यंगने  पहिल्या स्लिपच्या दिशेने टोलावला. त्याच्या हातामध्ये सरळ कॅच जात होता.

त्यावेळी सेकंड स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरने डावीकडे झेप मारत कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याने कॅच सोडलाच पण स्लिप उभ्या असलेल्या दोघांनाही तो बॉल पकडता आला नाही. बॉल बांऊड्री लाईनजवळ अडवण्यात आला. तोपर्यंत यंग आणि लॅथम जोडीने पळून 3 रन काढले होते.

ही चूक फक्त कॅच सुटेपर्यंत थांबली नाही. बाऊंड्री लाईनवरील फिल्डरने विकेट किपर नरूल हसनकडे बॉल फेकला. हसनने लगेच रन आऊट करण्यासाठी तो बॉल नॉन स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. तिथे कुणीही तो पकडला नाही. त्यामुळे बॉल सरळ बांऊड्रीच्या बाहेर गेला.बांगलादेशच्या टीमने घातलेल्या या सर्व घोळामुळे ज्या बॉलवर यंग आरामात कॅच आऊट झाला असता तिथं त्याला 7 रन (1 Ball 7 Runs) मिळाले.

न्यूझीलंडचे वर्चस्व

दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावर यजमान न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीमध्ये कॅप्टनसी सांभाळणाऱ्या टॉम लॅथमने (Tom Latham) दमदार सेंच्युरी झळकावली. दिवसाच्या अखेर लॅथम 186 रनवर खेळत असून डेवॉन कॉनवे (Devon Conway) 99 रनवर त्याला साथ देत आहे. बांगलादेशनं पहिल्याच दिवशी 1 आऊट 349 रन केले (1 Ball 7 Runs) आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: