फोटो – फेसबुक

त्याने 7 वर्षांपूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या कालावधीत तो 29 टेस्ट खेळला. त्यापैकी पहिल्या 20 टेस्टमध्ये त्याने जितके रन केले तेवढे पुढील 9 टेस्टमध्ये केले आहेत. पहिल्या 20 टेस्टमध्ये त्याला सेंच्युरी करता आली नव्हती. तसेच त्याच्या नावावर एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या हाफ सेंच्युरी होत्या. पण, सप्टेंबर 2019 मध्ये त्याचे लग्न झाले आणि त्याचा खेळ बदलला. आता लिंटन दास (Linton Das) हा बांगलादेशचा रनमशिन बनला आहे. लिंटनच्या करिअरला ‘लेडी लक’मुळे (Linton Das Lady Luck) मोठी गती मिळाली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध सेंच्युरी

बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (Bangladesh vs New Zealand) यांच्यातील दुसरी टेस्ट न्यूझीलंडने तिसऱ्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे जिंकली. न्यूझीलंडने 1 इनिंग आणि 117 रनने बांगलादेशचा पराभव केला. पहिल्या इनिंगमध्ये 126 वर आटोपलेली बांगलादेशची इनिंग दुसऱ्या इनिंगमध्ये 278 पर्यंत गेली.

लिंटन दासच्या सेंच्युरीमुळे बांगलादेशला पराभवातील अंतर कमी करता आले. दासने वन-डे क्रिकेटच्या स्टाईलने 114 बॉलमध्ये 102 रन काढले. त्याची ही टेस्ट क्रिकेटमधील दुसरी सेंच्युरी आहे. विशेष म्हणजे त्याने टेस्टमधील दोन्ही सेंच्युरी या लग्नानंतरच झळकावल्या (Linton Das Lady Luck) आहेत.

‘लेडी लक’ चा प्रभाव

लिंटन दासने 29 टेस्टच्या करिअरमध्ये एकूण 2 सेंच्युरी आणि 11 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. यापैकी दोन्ही सेंच्युरी आणि 7 हाफ सेंच्युरी त्याने लग्नानंतर म्हणजेच सप्टेंबर 2019 नंतर झळकावल्या आहेत. दासची 2021 पासूनची टेस्ट क्रिकेटमधील आकडेवारी आणखी भारी आहे.

दासने 2021 पासून आजवर 9 टेस्ट खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 2 सेंच्युरी आणि 6 हाफ सेंच्युरीसह 52.66  च्या सरासरीने 790 रन केले आहेत. त्याने मागील वर्षी खेळलेल्या 7 टेस्टमध्ये 594 तर यावर्षी खेळलेल्या 2 टेस्टमध्ये 196 रन केले आहेत. यावर्षी न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या 2 टेस्टमधील त्याची सरासरी 65.33 असून त्याने या सीरिजमध्ये बांगलादेशकडून सर्वात जास्त रन (Linton Das Lady Luck) केले आहेत.

2 इनिंग 250 रन 5 योगायोग, लॅथमने केली कॅप्टनची बरोबरी, तुम्ही म्हणाल क्या बात है!

बांगलादेश क्रिकेटचं भविष्य

लिंटन दास हा फक्त बांगलादेशच्या पिचवर नाही तर विदेशातील पिचवरही यशस्वी होत आहे. त्याने 2021 पासून बांगलादेशमधील 4 टेस्टमध्ये 53 च्या सरासरीने 424 रन केले आहेत. तर बांगलादेशच्या बाहेर 5 टेस्टमध्ये 52.28 च्या सरासरीने 366 रन केले आहेत.

न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या देशांच्या टीमविरुद्ध दासने ही कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला सध्या बांगलादेश क्रिकेटचे भविष्य (Linton Das Lady Luck) समजले जात आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: