फोटो ट्विटर, आयसीसी

नववर्षाचा पहिलाच दिवस असून क्रीकेट फॅन्सला पहिल्याच दिवशी सेंच्युरी पाहण्याचे भाग्य लाभले. बांगलादेशची टीम सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडच्या (New Zealand vs Bangladesh) दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात 1 जानेवारीपासून दोन्ही टीममधील पहिली टेस्ट सुरू झाली. न्यूझीलंडचा खेळाडू डेव्हॉन कॉनवे (Devon Conway Test Century) याने आपला गतवर्षातील फॉर्म कायम राखत सेंच्युरी झळकावली.

माऊंट माउंगानुई (Mount Maunganui) येथील बे ओव्हल स्टेडियमवर न्यूझीलंड आणि बांगलादेश टीममध्ये (New Zealand vs Bangladesh) पहिली मॅच सुरू आहे. टॉस जिंकून बांगलादेशने न्यूझीलंडला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. न्यूझीलंडचा ओपनर आणि कॅप्टन टॉम लेथन (Tom Latham) याला बांगलादेशचा फास्ट बॉलर शोरिफुल इस्लाम (Shoriful Islam) याने एक रनवर बाद केले.

विराट कोहलीनं कुणाचंही ऐकलं नाही, निवड समिती अध्यक्षांचा खळबळजनक दावा

यंगसोबत शतकी पार्टनरशिप

पहिली विकेट झटपट गमावल्यानंतर तिसऱ्या स्थानावर चौथी टेस्ट खेळणारा डेव्हॉन कॉनवे मैदानात उतरला. डेव्हॉन कॉनवे (Devon Conway Test Century) याने ओपनर विल यंगसोबत (Will Young) बांगलादेशच्या फास्ट बॉलर्सचा यशस्वीपणे सामना केला. दोघांनी तब्बल 45 ओव्हर खेळल्या आणि 138 धावांची पार्टनरशिप केली.

विल यंग याने टेस्ट करिअरमधील तिसरी हाफ सेंच्युरी पूर्ण केली. हाफ सेंच्युरीनंतर विल यंग चोरटा रन घेण्याचा प्रयत्न करताना रनआऊट झाला. आऊट होण्यापूर्वी त्याने 135 बॉलचा सामना केला आणि 52 रन केल्या.

नव्या वर्षात वाढणार इंग्लंडच्या अडचणी, जो रूट सोडणार कॅप्टनसी!

दुसरी सेंच्युरी

यंग आऊट झाल्यानंतर डेव्हॉन कॉनवे याने अनुभवी आणि अखेरची आंतरराष्ट्रीय सीरिज खेळणाऱ्या रॉस टेलरला (Ross Taylor) हाताशी धरत टीमला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. फॉर्मात असलेल्या डेव्हॉन कॉनवे (Devon Conway Test Century) याने यादरम्यान टेस्ट करिअरमधील दुसरी सेंच्युरी 186 बॉलमध्ये पूर्ण केली. यातील 72 रन त्याने फोर आणि सिक्सच्या मदतीने ठोकले.

फॉर्म कायम

डेव्हॉन कॉनवे याने 2 जून 2021 रोजी आपली पहिली टेस्ट इंग्लंडविरुद्ध खेळली होती. लॉर्डसच्या मैदानावर झालेल्या या टेस्टमध्ये डेव्हॉन कॉनवे याने अविस्मरणीय खेळी केली होती. पदार्पणाच्या या टेस्टमध्ये डेव्हॉन कॉनवे याने 200 रन केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने 347 बॉलचा सामना केला होता आणि 22 फोर आणि एका सिक्सच्या मदतीने ही खेळी सजवली होती.

2021 मध्ये त्याला न्यूझीलंडकडून तीन टेस्ट खेळण्याची संधी मिळाली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत या 30 वर्षीय खेळाडूने एक सेंच्युरी, (Devon Conway Test Century) एक डबल सेंच्युरी आणि 2 हाफ सेंच्युरी ठोकली. गेल्या वर्षीचा हा फॉर्म कायम राखत त्याने 2022 ची सुरुवात धमाकेदार केली आणि बांगलादेशविरुद्ध सेंच्युरी झळकावली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: