
पाकिस्तान कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने त्याच्या चुलत बहिणीशी साखरपुडा केल्याची बातमी उघड झाली आहे. बाबर सध्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेत भाग घेण्यासाठी यूएईमध्ये आहे. बाबर यूएईमध्ये क्वारंटाईन असताना पाकिस्तानच्यी वृत्त वाहिनीने त्याच्या साखरपुड्याची बातमी ‘ब्रेक’ केली. बाबर पुढच्या वर्षी लग्न करणार आहे. बहिणीशी लग्न करणारा बाबर हा पहिलाच क्रिकेटपटू नाही. यापूर्वी देखील क्रिकेटपटूंनी त्यांच्या बहिणीशी लग्न (cricketers married with sisters) केले आहे.
लैंगिक शोषणचा आरोप
कराची किंग्स (Karachi Kings) या टीमचा कॅप्टन असलेल्या बाबरला ही बातमी गुप्त ठेवायची होती. पण, त्याच्या पाकिस्तानी टीममधील खेळाडूंनी ही बातमी वृत्तवाहिन्यांना दिली. 26 वर्षांच्या बाबरचा लग्नापर्यंतचा प्रवास सरळ झालेला नाही. बाबरवर यापूर्वी एका महिलेनं लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ‘बाबरने लग्नाचं आमिष दाखवून माझं शोषण केलं. मला मारहाण केली तसेच जबरदस्तीने गर्भपात केला.’ असा आरोप या महिलेनं पत्रकार परिषद घेऊन केला होता.
सईद अन्वर
पाकिस्तान क्रिकेटमधील धार्मिक खेळाडू अशी सईद अन्वरची (Saeed Anwar) ओळख आहे. अन्वरने त्याची चुलत बहिण लुबानाशी 1996 साली लग्न केले. त्यांच्या मुलाचे 2001 साली निधन झाले. या निधनानंतर अन्वर धार्मिक बनला असे सांगितले जाते. सईद अन्वरच्या धार्मिक वागणुकीमुळे प्रभावित होऊन आपल्याला इस्लाम स्वीकारण्याची प्रेरणा मिळाली असा दावा मोहम्मद युसूफ (Mohammad Yousuf) याने केला आहे.
Mohammad Yousuf On Islam: ‘2006 चा जबरदस्त फॉर्म हे इस्लाम स्विकारल्याबद्दल अल्लाहने दिलेले बक्षीस’
शाहिद आफ्रिदी
पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) मुलींमध्ये मोठी लोकप्रियता आहे. त्याने खूप पूर्वी म्हणजे 2000 साली त्याची मामाची मुलगी नादिया (cricketers married with sisters) बरोबर लग्न केले. या दोघांना आता पाच मुली आहेत.
शाहिद आफ्रिदीच्या मुलीचे पाकिस्तानचा फास्ट बॉलर शाहिन आफ्रिदीशी (Shaheen Afridi) लग्न ठरले आहे. आपलं शाहिन आफ्रिदीच्या परिवाराशी काहीही नातं नाही, असे स्पष्टीकरण शाहिद आफ्रिदीने दिले आहे.
मोसद्देक हुसेन
बांगलादेशचा क्रिकेटपटू मोसद्देक हुसेन (Mosaddek Hossain) याने 2012 साली त्याची चुलत बहीण शरमीन समीराशी लग्न केले होते. त्यानंतर शरमीननं हुसेनवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला. त्यामुळे हे लग्न तुटले. हुसेननं मागच्या वर्षी दुसरे लग्न केले आहे.
भर मैदानात सहकाऱ्याला मारणार होता ‘हा’ बांगलादेशी, पाहा व्हिडीओ
मुस्तफिजुर रहमान
न्यूझीलंडमध्ये 2019 साली झालेल्या बॉम्बस्फोटातून बांगलादेशची टीम थोडक्यात बचावली. या घटनेचा मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) याच्या मनावर मोठा परिणाम झाला. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्याने बांगलादेशात परत येताच चुलत बहिण परवीन शिमूशी (cricketers married with sisters) लग्न केले.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.