फोटो – ट्विटर, आयसीसी

टेस्ट क्रिकेटसाठी नववर्षाची सुरुवात धक्कादायक झाली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन न्यूझीलंडला होम ग्राउंडवर बांगलादेशच्या टीमने (BAN vs NZ) पराभूत केले. बांगलादेशने इतिहास रचत न्यूझीलंडच्या टीमचा पहिल्या टेस्टमध्ये 8 विकेट्सने दणदणीत पराभव (Bangladesh Historic Test Win) केला. न्यूझीलंडला त्यांच्याच देशामध्ये हरवण्याचा रेकॉर्ड करत बांगलादेशने सीरिजमध्ये 1-0 आघाडी घेतली. बे ओव्हल मैदानात झालेली ही मॅच बांगलादेशच्या टेस्ट क्रिकेटला कलाटणी देणारी ठरणार आहे. बांगलादेशने या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये केलेले सेलिब्रेशनही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

इतिहास रचला

न्यूझीलंड आणि बांगलादेशमधील दोन टेस्ट सीरिजमधील पहिली टेस्ट बे ओव्हलच्या मैदानावर रंगली. न्यूझीलंडने डेवॉन कॉनवेच्या सेंच्युरीच्या बळावर पहिल्या इनिंगमध्ये 328 रन केल्या. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशने सांघिक खेळ करत पहिल्या इनिंगमध्ये 458 रन करत 130 रनची आघाडी घेतली. हीच आघाडी निर्णयाक ठरली.

12 वर्षांपासून संधीची वाट पाहणारा क्रिकेटपटू भावूक, रेड बॉल हातात घेऊन केली विनंती

दुसऱ्या इनिंगमध्ये बांगलादेशने न्यूझीलंडला अवघ्या 169 रनमध्ये ऑलआऊट केले. न्यूझीलंडमधील पहिल्या टेस्ट विजयासाठी बांगलादेशपुढे 40 रनचे नाममात्र आव्हान होते. हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात बांगलादेशने (Bangladesh Historic Test Win) पूर्ण केले. बांगलादेशचा SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशातील हा पहिलाच टेस्ट विजय आहे.

या व्हिडीओमध्ये सर्व बांगलादेशी खेळाडू आणि स्टाफ एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. अनुभवी खेळाडू मुशफिकूर रहीम त्यांना काही तरी सांगताना दिसत आहे. आपण ऐतिहासिक विजय मिळवला आहे, त्याचे सेलिब्रेशन केले पाहिजे असे रहीमने सांंगताच सर्व खेळाडू आनंदाने उड्या मारू लागतात.

विजयाचा नायक

बांगलादेशाने सांघिक खेळाच्या बळावर ही टेस्ट जिंकली असली तरी विजयाचा (Bangladesh Historic Test Win) खरा नायक ठरला तो फास्ट बॉलर इबादत हुसेन (Ebadot Hossain). पहिल्या इनिंगमध्ये फक्त 1 विकेट्स घेणाऱ्या इबादतने दुसऱ्या इनिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. इबादत हुसेनने 21 ओव्हरची गोलंदाजी केली आणि 6 विकेट्स घेतल्या.

शार्दुल कसा बनला ‘लॉर्ड ठाकूर’, अखेर रहस्य उलगडले…

दोन्ही इनिंगमध्ये हाफ सेंच्युरी करणारा विल यंग, पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणारा डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) यांच्यासह रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल आणि काइल जेमिन्सन यांना इबादतने आऊट केले. 11 टेस्टच्या छोट्या करिअरमधील बेस्ट स्पेल इबादतने न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये टाकला. यामुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच‘ हा पुरस्कारही मिळाला. विशेष म्हणजे तब्बल 9 वर्षांनी बांगलादेशच्या कोणत्याही बॉलरने 5 विकेट्स घेतल्या. याआधी रुबेल हुसेन याने 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 5 विकेट्स घेतल्या होत्या.

पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ

आयसीसीच्या (ICC) नियमानुसार टेस्ट मॅच जिंकल्यामुळे बांगलादेशला 12 पॉईंट्स मिळाले आहेत, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सची पाटी कोरी राहिली आहे. बांगलादेशच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship 2021-2023) पॉईंट टॅलीमध्ये उलथापालथ झाली आहे. न्यूझीलंडची टीम बांगलादेशच्याही खाली गेली आहे.

पॉईंट टेबलमध्ये बांगलादेशने (Bangladesh Historic Test Win) पाचव्या नंबरवर झेप घेतली आहे. बांगलादेशकडे 1 विजय, 2 पराभवांसह 12 पॉईंट्स आहेत, तर न्यूझीलंडची टीम 2 पराभव, 1 ड्रॉ यामुळे सातव्या नंबरवर फेकली गेली आहे. 3 विजयांसह ऑस्ट्रेलिया पहिल्या तर 4 विजय, 1 पराभव आणि 2 ड्रॉ सह टीम इंडिया चौथ्या नंबरवर आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: