फोटो – सोशल मीडिया

30 डिसेंबर 2014 हा दिवस क्रिकेट फॅन्स कधीही विसरु शकणार नाहीत. महेंद्रसिंह धोनीने ( MS Dhoni) त्या दिवशी अचानक टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर करत क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती.

टीम इंडियाने मेलबर्नमध्ये झालेली बॉक्सिंग डे (Boxing Day) टेस्ट ड्रॉ केली. धोनीच्या कॅप्टनसीखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच पराभव टाळला होता. मॅचच्या पाचव्या दिवशी धोनी प्रथेप्रमाणे सर्व मीडियाला सामोरा गेला. भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमधील एक टेस्ट बाकी होती. ती पत्रकार परिषद संपल्यानंतर काही वेळाने बीसीसीआयने अचानक महेंद्रसिंह धोनी टेस्ट क्रिकेटमधून रिटायर होत असल्याचं पत्रक प्रसिद्ध करत सर्वांना धक्का दिला होता.

धोनीने 2008 साली अनिल कुंबळेकडून टेस्ट टीमची कॅप्टनसी स्विकारली होती. धोनीच्या कॅप्टनसीखालीच टीम इंडियाने न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये टेस्ट सीरिज जिंकली. त्याचबरोबर 2009 साली भारतीय टीम टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 वर पोहचली होती. धोनीच्याच कॅप्टनसीखाली टीम इंडियाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला चार टेस्टच्या सीरिजमध्ये व्हाईटवॉश दिला होता.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्यात मात्र टीम इंडियाला अपयश आलं. 2011 साली टीम इंडियाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात सर्व टेस्ट गमावण्याची नामुष्की सहन करावी लागली. त्या दौऱ्यातील धोनीच्या बचावात्मक कॅप्टनसीवरही अनेकांनी टीका केली होती.

महेंद्रसिंह धोनीच्या टेस्ट कॅप्टनसीखालील टीम इंडियाची कामगिरी

एकूण टेस्ट60
विजय27
पराभव18
ड्रॉ15
विजयाची सरासरी45.00
पराभवाची सरासरी60.00

धोनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील टेस्ट सीरिजमध्ये अपयशी ठरला असला तरी तो भारताचा एक यशस्वी टेस्ट कॅप्टन आहे. धोनीनं एकूण 60 टेस्टमध्ये भारतीय टीमचं नेतृत्व केलं. त्यापैकी 27 टेस्टमध्ये भारतानं विजय मिळवला. 18 टेस्टमध्ये पराभव सहन करावा लागला तर उर्वरित 15 टेस्ट ड्रॉ झाल्या.

( वाचा : ‘बाळाच्या जन्मावेळी माही सोबत नव्हता तेंव्हा काय वाटलं?’; साक्षीने सांगितली ‘मन की बात’ )

धोनी एकूण 90 टेस्ट खेळला. 100 वी टेस्ट खेळण्याचा सन्मान सहज मिळण्याची संधी असताना स्वत:हून टेस्ट क्रिकेटमधून बाजूला झाला. रिटायरमेंटपूर्वी त्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 4876 रन्स केले होते. त्याने 38.09 च्या सरासरीनं हे रन्स केले. यामध्ये 6 सेंच्युरी आणि 33 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईमध्ये 2013 साली काढलेले 224 रन्स हा त्याचा टेस्टमधील सर्वोच्च स्कोअर. एक उत्तम विकेटकिपर असलेल्या धोनीनं टेस्टमध्ये 256 कॅच घेतल्या तर 38 जणांना स्टंपिंग करत आऊट केले.

महेंद्रसिंह धोनीची टेस्ट कारकीर्द

टेस्ट90
रन्स4876
सरासरी38.09
सर्वोच्च224
100/506/33
कॅच256
स्टंपिंग38

टेस्ट क्रिकेटमधून 2014 च्या शेवटी रिटायर झालेला धोनी त्यानंतर साडेचार वर्ष आंतरराष्ट्रीय वन-डे आणि T20 क्रिकेट खेळत होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये झालेली सेमी फायनल हा धोनीच्या कारकीर्दीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. त्यानंतर त्याने वर्षभर क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. अखेर 15 ऑगस्ट 2020 मध्ये त्यानं सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: