
क्रिकेट विश्वात 7 फेब्रुवारी हा दिवस अनिल कुंबळेचा (Anil Kumble) दिवस म्हणून ओळखला जातो. आजच्याच दिवशी (7 फेब्रुवारी 1999) अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम (Anil Kumble 10 Wickets) केला होता. हा पराक्रम करणारा कुंबळे हा आजवरचा एकमेव भारतीय आणि इंग्लंडच्या जिमी लेकर नंतरचा दुसरा बॉलर आहे.
विजय होता आवश्यक
पाकिस्तानने चेन्नई टेस्ट जिंकून दोन टेस्टच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती. भारताला सीरिज बरोबरीत राखण्यासाठी दिल्ली टेस्ट जिंकणे आवश्यक होते. नवी दिल्लातल्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी कुंबळेनं ती ‘अपेक्षापूर्ती’ केली. कुंबेळनं 74 रन्स देत पाकिस्तानच्या सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या.
दिल्ली टेस्टमध्ये भारताने पहिल्यांदा बॅटिंग करताना सदागोपन रमेश आणि अहरुद्दीनच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर पहिल्या इनिंगमध्ये 252 रन्स केले होते. भारतीय बॉलर्सनी टिच्चून मारा करत पाकिस्तानची पहिली इनिंग 172 रन्सवर रोखली. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये सदागोपन रमेश आणि सौरव गांगुलीने हाफ सेंच्युरी झळकावली. या दोघांच्या चिवट खेळामुळे भारताने पाकिस्तानपुढे विजयासाठी 420 रन्सचे टार्गेट ठेवले.
क्रिकेट फॅन्सच्या आजही डोळ्यात पाणी आणणारी सचिनची चेन्नई टेस्टमधील सेंच्युरी!
अनिल कुंबळे दिवस
दिल्ली टेस्टचा दोन दिवसाचा खेळ बाकी असल्याने 420 चे टार्गेट अशक्य नव्हते. त्यातच सईद अन्वर-शाहीद आफ्रिदी जोडीने 101 रन्सची पार्टरनरशिप करत पाकिस्तानला भक्कम सुरुवात करुन दिली होती. कुंबळेने आफ्रिदीला नयन मोंगियाकरवी कॅच आऊट करत पहिली विकेट घेतली. त्यानंतर फिरोजशाह कोटलावर कुंबळेचा जलवा (Anil Kumble 10 Wickets) सुरु झाला. पुढच्या पाच ओव्हरमध्ये एजाज अहमद, इंझमाम उल हक आणि मोहम्मद युसूफला कुंबळेनं आऊट केलं. मोईन खानही फार काळ टिकू शकला नाही. त्यापाठोपाठ कुंबळेनं एक बाजू लावून उभा असलेल्या सईद अन्वरला आऊट करत मॅचवरील भारताची पकड घट्ट केली.
पाकिस्तानचा कॅप्टन वासिम अक्रम आणि अनुभवी सलीम मलिक यांनी काही काळ ही पडझड रोखली. या दोघांनी 50 रन्सची पार्टनरशिप केली. कुंबळेनं मलिकचा बचाव भेदत ही जोडी फोडली आणि पाकिस्तानचे शेपूट सुरु झाले. मुश्ताक अहमद आणि सकलेन मुश्ताक या बॉलर्सनाही कुंबळेने झटपट आऊट केले.
एका इनिंगमध्ये 10 विकेट्स आणि द्रविड-श्रीनाथ कनेक्शन, एक-दोनदा नाही तर 3 वेळा घडला प्रकार
श्रीनाथची मदत
आता अनिल कुंबळे ‘परफेक्ट 10’ विकेट्स घेण्याच्या ऐतिहासिक विक्रमापासून फक्त एक विकेट दूर होता. त्यावेळी जवागल श्रीनाथ कुंबळेच्या मदतीला धावला. श्रीनाथने सातत्याने स्टंपच्या बाहेर बॉल टाकत कुंबळे दहा विकेट्स घेण्याच्या रेकॉर्डपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली. या दरम्यान श्रीनाथने वाईड बॉल देखील टाकला.
अखेर अनिल कुंबळेच्या बॉलिंगवर वासिम अक्रमचा उडालेला कॅच व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने टिपला. टेस्ट क्रिकेटमधील एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेणारा अनिल कुंबळे दुसरा बॉलर (Anil Kumble 10 Wickets) बनला. अनिल कुंबळेच्या या जम्बो पराक्रमामुळेच 7 फेब्रुवारी हा दिवस क्रिकेट विश्वात ‘अनिल कुंबळे दिवस’ म्हणून ओळखला जातो.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.