फोटो – ट्विटर /ICC

कपिल देवच्या (Kapil Dev) टीमनं 1983 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटींग करुन फक्त 183 रन केले होते. बलाढ्य वेस्ट इंडिज विरुद्धची मॅच भारतानं ती मॅच हरली असाच सर्वांचा समज झाला होता. त्यावेळी कपिलच्या टीमनं जिद्दीनं खेळ करत वेस्ट इंडिजला ऑल आऊट करत वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीच्या टीमनं 2008 साली झालेल्या U19 वर्ल्ड कप फायनलमध्ये (U19 World Cup 2008) पहिल्यांदा बॅटींग करत फक्त 159 रन केले होते.  विराटच्या टीमनं त्या माफक स्कोअरचं संरक्षण करत वर्ल्ड कप जिंकला. त्या ऐतिहासिक कामगिरीला आज (2 मार्च 2022) 14 वर्ष झाले आहेत.

कशी जिंकली वर्ल्ड कप फायनल

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीमनं 2008 च्या अंडर 19 टीमने त्या वर्ल्ड कपमधील सर्व मॅच जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलमध्ये भारताचा सामना वेन पार्नेल (Wayne Parnell) च्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेशी होता. दक्षिण आफ्रिकेनं पाकिस्तानला हरवत फायनल गाठली होती.

मलेशियाची राजधानी कौलालंपूरमध्ये (Kaula Lumpur) झालेल्या फायनलमध्ये वेन पार्नेलनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी तो निर्णय योग्य ठरवला. पहिल्या दहा ओव्हरमध्ये भारताला 2 विकेटच्या बदल्यात फक्त 29 रन करता आले होते.

कपिल देवनं फक्त कॅच नाही, तर वर्ल्ड कप पकडला!

विराट कोहली आणि तन्मय श्रीवास्तव (Tanmay Srivastava) यांनी टीमला सावरण्याचा प्रयत्न केला. पण, विराट कोहलीला 19 रनवर आऊट करत आफ्रिकेनं ही जोडी फोडली. त्यानंतर तन्मय श्रीवास्तव 46 रन काढून आऊट झाला. 2008 च्या फायनलमधील (U19 World Cup 2008) हा सर्वोच्च स्कोअर ठरला.

सौरभ तिवारी (Saurabh Tiwary) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांनी प्रत्येकी 20 रन काढले. पण भारताला निर्धारीत 50 ओव्हर्सही पूर्ण खेळता आल्या नाही. भारताची टीम 45.4 ओव्हरमध्ये 159 रनवर आऊट झाली.

दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात

भारताला 160 रन वाचवण्यासाठी झटपट विकेट घेणं हाच पर्याय होता. प्रदीप संगवान आणि अजितेश अग्रवाल यांनी अचूक मारा करत दक्षिण आफ्रिकेला जखडून ठेवलं. अजितेशनं दोन झटपट विकेट घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचा तिसरा बॅट्समन रन आऊट झाल्यानं पाऊस येण्यापूर्वी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचं समीकरण बिघडलं.

पावसानंतर डकवर्थ लुईस मेथडनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर 25 ओव्हरमध्ये 116 रनचं टार्गेट ठेवण्यात आले होते. दक्षिण आफ्रिकेला 8 आऊट 103 रनच करता आले आणि भारतानं 12 रननं वर्ल्ड कप जिंकला. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 19 रन हवे होते आणि त्यांच्या पाच विकेट्स शिल्लक होत्या.

सिद्धार्थ कौलनं (Siddarth Kaul) फक्त 7 रन देत दोन विकेट्स घेतल्या. पहिल्या बॉलवर चौकार बसल्यानंतर कौलनं जिद्दीनं कमबॅक केलं. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली भारतानं 2000 साली अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आठ वर्षांनी विराट कोहलीच्या टीमनं (U19 World Cup 2008) त्याची पुनरावृत्ती केली. पाच ओव्हरमध्ये फक्त 7 रन देऊन 2 विकेट्स घेणारा अजितेश अगरवाल हा ‘मॅन ऑफ द मॅच’ बनला.

राष्ट्रीय टीममध्ये कोण आले?

2008 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमुळेच भारताला विराट कोहली मिळाला. विराट आज भारताचा सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टन आहे. तसंच जगातील सध्याचा प्रमुख बॅट्समन आहे.

U19 World Cup : इंग्लंडवर भारताचे ‘राज’ टीम इंडियानं पाचव्यांदा जिंकला वर्ल्ड कप

विराट कोहलीशिवाय रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), मनिष पांडे, सिद्धार्थ कौल आणि सौरभ तिवारी या चार खेळाडूंनी भारताकडून आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: