फोटो – मुंबई इंडियन्स

आयपीएल स्पर्धेचा आजवरचा इतिहास अनेक रंगतदार मॅचचा आहे. अगदी शेवटच्या बॉलवर मॅचचं पूर्ण चित्र बदलल्याचं आपण या स्पर्धेत पाहिलं आहे. त्यामुळेच ही जगातील सर्वात टफ क्रिकेट लीग आहे. आजच्या दिवशी 2014 साली (25 मे 2014) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Mumbai Indians vs Rajasthan Royals) यांच्यात झालेली मॅच आजही क्रिकेट फॅन्सच्या लक्षात आहे. या मॅचमध्ये आदित्य तरेनं (Aditya Tare) सिक्स मारत मुंबई इंडियन्सला ‘प्ले ऑफ’ मध्ये नेलं. तरेच्या या सिक्सने वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असलेले प्रेक्षक आनंदाने बेभान झाले होते. त्याचवेळी राजस्थानच्या ड्रेसिंग रुममध्ये याचा इतका मोठा शॉक बसला की कायम शांत, संयमी म्हणून प्रसिद्ध असलेला राजस्थानच्या टीमचा तेव्हाचा मेंटॉर राहुल द्रविडनं (Rahul Dravid) त्यावेळी रागाने टोपी खाली टाकली होती. तरेचा सिक्स आणि द्रविडचा राग (Tare-Dravid Moment) यामुळे ही मॅच सर्वांच्या लक्षात आहे.

रनरेटचे गणित

आयपीएल 2014 मधील (IPL 2014) ती शेवटची लीग मॅच होती. त्या सीरिजमध्ये राजस्थान रॉयल्सने अनेक प्रयोग केले होते. तर मुंबई इंडियन्सनं अत्यंत खराब सुरुवातीनंतर गती पकडली होती. असं असलं तरी शेवटची मॅच जिंकून ‘प्ले ऑफ’ला क्वालिफाय होणे मुंबई इंडियन्ससाठी सोपे नव्हते. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून ‘प्ले ऑफ’मध्ये क्वालिफाय राजस्थानने दिलेलं कोणतंही टार्गेट 14.3 ओव्हर्समध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने पहिल्यांदा बॅटींग करत संजू सॅमसनच्या (Sanju Samson) 74 रनच्या जोरावर मुंबईसमोर 190 रन्सचं टार्गेट ठेवलं.

आक्रमक खेळ हाच पर्याय

मुंबईला 14.3 ओव्हर्समध्ये 190 रन्स करण्यासाठी आक्रमकता हाच पर्याय होता. लेंडल सिमन्स, माईक हसी, कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा हे सर्व जण झटपट रन काढण्याच्या नादात आऊट झाले. मुंबई इंडियन्सची 10 व्या ओव्हरमध्ये अवस्था 4 आऊट 108 होती. त्यानंतर कोरे अँडरसन (Corey Anderson) आणि अंबाती रायुडू (Ambati Rayudu) ही जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 31 बॉलमध्ये 81 रन्सची पार्टरनरशिप (Tare-Dravid Moment) केली.

मुंबई इंडियन्स : बेस्ट टीमचे बेस्ट विजेतेपद

15 व्या ओव्हरमधील नाट्य

मुंबई इंडियन्सला 15 व्या ओव्हर्सच्या सुरुवातीला क्वालिफाय होण्यासाठी 3 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता होती. राजस्थानकडून जेम्स फॉकनर (James Faulkner) ओव्हर टाकण्यासाठी आला. त्या मॅचमध्ये 43 बॉलमध्ये 94 रन काढणाऱ्या अँडरसनला पहिल्या बॉलवर फक्त 1 रन काढता आला. जिगरबाज रायुडूने दुसऱ्या बॉलवर सिक्स लगावला. आता मुंबईला क्वालिफाय होण्यासाठी 1 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता होती. त्यावेळी फॉकनरने हुशारीने टाकलेला बॉल रायुडूला नीट मारता आला नाही. तो बॉल फार लांब गेला नाही. रायूडू आणि अँडरसनसमोर रन काढण्यासाठी पळण्यावाचून काहीच पर्याय नव्हता. राजस्थानचा कॅप्टन शेन वॉटसनने अचूक थ्रो केला असता तर रायुडू पहिला रन काढतानाच रन आऊट झाला असता. वॉटसनचा थ्रो चुकला त्यामुळे मुंबईचे बॅट्समन दुसरा रन काढण्यासाठी पळाले. पण वॉटसनचा चुकलेला थ्रो अडवलेल्या करुण नायरने कोणतीही चूक केली नाही. त्याने विकेट किपर संजू सॅमसनकडे अचूक थ्रो केला. रायुडू दुसरा रन काढण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला.

विजय शंकरला सोशल मीडियावर हवं तितकं Troll करण्यापूर्वी हे नक्की वाचा

पिक्चर बाकी था!

मुंबईला मॅच जिंकण्यासाठी आता 27 बॉलमध्ये फक्त 1 रन हवा होता. तरीही रायुडू निराश अवस्थेत मैदानात बसला. राजस्थानच्या टीमने मुंबईला मागे टाकत क्वालिफाय झाल्याचा जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. पण त्यावेळी दोन्ही टीमचा स्कोअर समान होता. त्यामुळे मुंबईच्या क्वालिफायचे गणित बदलले होते.

फोटो – cricketcountry

आता मुंबईला क्वालिफाय होण्यासाठी 1 बॉलमध्ये 4 रनची गरज होती. त्या मॅचमध्ये पहिलाच बॉल खेळणारा आदित्य तरे स्ट्राईकवर होता. आदित्य आयपीएलमध्ये कमी खेळला आहे. पण वानखेडे स्टेडियम त्याचं घरचं मैदान आहे. तसेच त्याच्याक़डे देशांतर्गत क्रिकेटमध्येही मोठा अनुभव आहे. जेम्स फॉकनरनं आदित्यला खराब फुल टॉस टाकला. आदित्यने तो थेट सिक्स लगावाला. त्याच्या सिक्सने मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’ ला क्वालिफाय झाली. मुंबई इंडियन्सची टीम, वानखेडेवरील उपस्थित प्रेक्षक आनंदाने बेभान झाले होते. त्याचवेळी फॉकनरच्या त्या खराब बॉलमुळे राहुल द्रविडला निराशा लपवता आली नाही. त्याने टोपी खाली टाकून राग व्यक्त केला.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: