
जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) हे कर्नाटकने भारतीय क्रिकेटला दिलेले दोन अव्वल बॉलर आहेत. या दोघांनी साधारण एकाच काळात क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. आधी कर्नाटक आणि नंतर भारतीय टीमसाठी दोघे बराच काळ एकत्र खेळले. श्रीनाथ-कुंबळे हे दोघे परस्परांचे घट्ट मित्र आहेत. अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध 1999 साली एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. कुंबळेला हा पराक्रम करता यावा यासाठी त्याचा जुना दोस्त जवागल श्रीनाथने सर्वात जास्त मदत (Srinath help Kumble) केली होती.
नेमेके काय घडले?
फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या त्या टेस्टमधील चौथा दिवस हा अनिल कुंबळेचा होता. चांगल्या सुरुवातीनंतर कुंबळेच्या भेदक बॉलिंगपुढे पाकिस्तानची टीम गगडली. ‘टी टाईम’ पर्यंत पाकिस्तानच्या 6 विकेट्स गेल्या होत्या. या सर्व विकेट्स अनिल कुंबळेने घेतल्या होत्या.
टी टाईम नंतरही कुंबळेची भेदकता कायम होती. त्याने सातवी, आठवी आणि नववी विकेटही घेतली. आता कुंबळे ‘परफेक्ट 10’ विकेट घेण्यापासून फक्त एक विकेट दूर होता. यापूर्वी इंग्लंडच्या जिमी लेकर यांनीच हा पराक्रम केला होता. वासिम अक्रम आणि वकार युनुस ही पाकिस्तानची शेवटची जोडी मैदानात होती.
टीम इंडियाचा पहिला अस्सल ‘फास्ट’ बॉलर!
मित्र असावा तर असा
जवागल श्रीनाथ त्यावेळी दुसऱ्या बाजूने बॉलिंग करत होता. श्रीनाथने शेवटची विकेट घेतली असती तर कुंबळेचा तो रेकॉर्ड हुकला असता. त्यामुळे श्रीनाथने निस्वार्थीपणे बॉलिंग केली. त्याने सातत्याने स्टंपच्या बाहेर बॉल टाकत शेवटचा बॅट्समन आऊट होणार नाही याची काळजी घेतली. अखेर कुंबळेने वासिम अक्रमला आऊट करत ‘परफेक्ट 10’ चा रेकॉर्ड पूर्ण केला. मात्र या रेकॉर्डचा पडद्याआडचा हिरो जवागल श्रीनाथ होता.
‘’मला शेवटची विकेट घेऊ नकोस असे कुणीही सांगितले नव्हते. अनिल वर्ल्ड रेकॉर्डच्या उंबरठ्यावर होता. त्यामुळे मी स्वत: तशी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.’’ अशी प्रतिक्रिया श्रीनाथने त्यानंतर व्यक्त (Srinath help Kumble) केली होती.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.