फोटो – BCCI/IPL

विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डीव्हिलियर्स (Ab de Villiers). भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे सर्वोत्तम बॅट्समन. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चे आधारस्तंभ. विराट गेली 13 वर्ष तर डीव्हिलियर्स गेली 10 वर्ष आरसीबीकडं आहे. या काळात या दोघांमध्ये घट्ट मैत्रीचं आणि विश्वासाचं नातं निर्माण झालंय. हे नातं वारंवार मैदानातही दिसतं. इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत सर्वाधिक रन्सच्या पार्टरनशिपचा रेकॉर्डही याच जोडीच्या नावावर आहे. आजच्याच दिवशी (On This Day) 2016 साली विराट-ABD जोडीचं IPL मध्ये वादळ आलं होतं. त्यांचा हा खेळ पाहून ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी (Ronaldo and Messi) हे दोन जगप्रसिद्ध फुटबॉलपटू एकाच टीममध्ये खेळत आहेत, अशी प्रतिक्रिया क्रिकेट विश्वात उमटली होती.

काय घडलं होतं?

गुजरात लॉयन्सचा (Gujarat Lions) कॅप्टन सुरेश रैना (Suresh Raina) अनफिट होता. नऊ वर्षांच्या आयपीएल इतिहासात रैनाला पहिल्यांदाच एखादी मॅच खेळता आली नव्हती. गुजरातचा प्रभारी कॅप्टन ब्रँडन मॅकलमनं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. धवल कुलकर्णीनं तिसऱ्याच ओव्हरमध्ये ख्रिस गेलला (Chris Gayle) आऊट केले. गेल 6 रन्स काढून आऊट झाला. त्यानंतर विराटच्या जोडीला डीव्हिलियर्स मैदानात उतरला.

( वाचा : ‘आठ वर्षांपासून एकही IPL ट्रॉफी जिंकली नाही, तरी कॅप्टन कसा?’, गंभीरचा विराटला प्रश्न )

तो दिवस हा विराट-ABD जोडीचा होता. बंगळुरुत चिन्नास्वामी स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर ते खेळत होते. दोघेही फॉर्मात होते. मैदान बॅटिंगला अनुकूल होतं. घरच्या प्रेक्षकांची साथ होती. विराट-ABD जोडीनं गुजरातच्या बॉलर्सची हजेरी घेण्यास सुरुवात केली.

विराटनं 55 बॉल्समध्ये 5 फोर आणि 8 सिक्सर्सच्या मदतीनं 109 रन्स काढले. डीव्हिलियर्स विराटपेक्षाही आक्रमक खेळला. त्याने 52 बॉल्समध्ये 10 फोर आणि 12 सिक्सर्सच्या मदतीनं नाबाद 129 रन्स काढले होते. त्या दोघांनी गुजरातच्या बॉलर्सना कोणताही चान्स दिला नाही. रवींद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) अपवाद वगळता गुजरातच्या अन्य 6 बॉलर्सचा त्या मॅचचा इकॉनॉमी रेट हा 10 पेक्षा जास्त होता.

20 सिक्स आणि 14 फोर

विराट-ABD जोडीनं 229 रन्सची पार्टनरशिप केली. त्यासाठी त्यांना फक्त 96 बॉल्स लागले. या पार्टरनरशिपमध्ये या जोडीनं 20 सिक्स आणि 14 फोर लगावले. ही आयपीएलमधील आजवरची कोणत्याही विकेटसाठी झालेली सर्वोच्च पार्टरनरशिप आहे. आरसीबीनं पहिल्या 11 ओव्हर्समध्ये 81 रन्स काढले होते. या जोडीनं शेवटच्या 9 ओव्हरमध्ये म्हणजेच 54 बॉलमध्ये 167 रन्स काढले.

( वाचा : IPL 2020 : आरसीबीसाठी पहिले पाढे (नेहमीच) पंचावन्न! )

विराट-डीव्हिलियर्स यांच्या रेकॉर्डब्रेक पार्टरनरशिपमुळे आरसीबीने ती मॅच 144 रन्सने जिंकली. सोशल मीडियावर साहजिकच या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. यामध्ये सर्वात बोलकी प्रतिक्रिया होती ती म्हणजे इंग्लंडचा आक्रमक बॅट्समन जोस बटलरची (Jos Buttler). ‘हे रोनाल्डो आणि मेस्सी एकाच टीममध्ये असल्यासारखं आहे’ असं ट्विट बटलरनं तेंव्हा केलं होतं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: