सौजन्य: ट्विटर

पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Pakistan vs Australia) यांच्यातील संथ सुरू असलेल्या लाहोर टेस्टमध्ये रंग भरला आहे. रावळपिंडी आणि कराची प्रमाणे लाहोरच्या पिचवर जवळपास 3 दिवस रटाळ खेळ झाला. या टेस्टची वाटचालही ड्रॉ होण्याच्या दिशेनं सुरू असतानाच यामध्ये ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या दिवसाच्या अखेर वर्चस्व मिळवलं. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कने टाकलेल्या जादुई बॉलमुळे (Starc Cummins show vs Pakistan) पाकिस्तान टीम आश्चर्यचकित झाली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात स्टार्कनं रिव्हर्स स्विंगच्या जाळ्यात पाकिस्तानला अडकवलं. त्यामधून त्यांच्या पहिल्या इनिंगची सुटका झालीच नाही.

मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) टाकलेला बॉल इतका अप्रतिम होता की अनुभवी बॅटर आणि व्हाईस कॅप्टन मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) त्यापूढे निरुत्तर ठरला. रिझवानला स्टार्कने बोल्ड केल्यानंतर स्टंप हवेत उडून दीड फूट लांब जाऊन पडला. त्यापूर्वी फवाद आलमबाबत देखील फार काही वेगळं घडलं नव्हतं.

आलम आणि रिझवानच्या विकेटने पाडले खिंडार

स्टार्कने पहिल्यांदा फवाद आलमची विकेट घेतली. त्यावेळी पाकिस्तानचा स्कोर 4 आऊट 248 होता. स्टार्कने टाकलेल्या बॉल डिफेन्स करण्याचा नादात फवादनं विकेट गमावली. बॅट आणि पॅडमधील असलेल्या गॅपमुळे बॉल सरळ स्टंपवर जाऊन आदळला.स्टार्कने टाकलेला बॉल रिव्हर्स स्विंग झाला होता. झिम्बाब्वे, बांगलादेश, वेस्ट इंडिज विरूद्ध रन करणारा फवाद ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याच्याच पिचवर साफ अपयशी ठरला आहे.

रिझवानचीही दांडी गूल

फवादची विकेट घेतल्यानंतर स्टार्कने पुढच्याच ओव्हरला कराची टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत मॅच वाचवणाऱ्या रिझवानचा अडसर देखील दूर केला. ‘राऊंड द विकेट’ बॉलिंग करत स्टार्कनं रिझवानचा डिफेन्स भेदला. रिझवान अवघी एक रन काढून आऊट झाला.

PAK vs AUS : कराचीत आफ्रिदी नाही तर स्टार्क सुपरहिट! भेदक यॉर्करनं उडवली दाणादाण

कमिन्सचा जलवा

रिझवान आऊट झाला तेव्हा पाकिस्तानची अर्धी टीम पॅव्हेलियनमध्ये परतली होती आणि स्कोर होता 256. स्टार्कच्या हादऱ्यातून सावरत नाही तोच कॅप्टन पॅट कमिन्सने पाच विकेट्स घेत पाकिस्तानच्या इनिंग संपवली. साजिद खान आणि हसन अली यांना खातं देखील उघडता आले नाही. पहिल्यांदा या सिरीजमध्ये एखाद्या बॉलरने पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. स्टार्क आणि कमिन्सने तिसऱ्या सेशनमध्ये घातलेल्या धुमाकूळानं (Starc Cummins show vs Pakistan) पाकिस्ताननं फक्त 20 रनमध्ये 7 विकेट्स गमावल्या.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: