फोटो – ट्विटर, आयसीसी

पाकिस्तान क्रिकेटसाठी आजचा दिवस (14 मार्च 2022) हा लाजीरवाणा ठरत आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये (Women’s World Cup) बांगलादेशनं पाकिस्तानचा पराभव केला. पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या बांगलादोशच्या टीमनं पाकिस्तानला लोळवलं. त्यानंतर पुरूष टीमनं स्वत:च्याच घरात लाज घालवली. ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या कराची टेस्टमध्ये (Pakistan vs Australia, Karachi Test) पाकिस्तानची नाचक्की झाली. कराचीच्या पिचवर ऑस्ट्रेलियानं दोन दिवसांपेक्षा जास्त बॅटींग करत 9 आऊट 556 रन केले. त्याला उत्तर देताना पाकिस्तानची पहिली इनिंग फक्त 53 ओव्हर्समध्ये 148 रन काढून ऑल आऊट (Pakistan 148 all out) झाली.

डाव उलटला

ऑस्ट्रेलियाची टीम 24 वर्षांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आली आहे. या टीममधील एकही खेळाडू यापूर्वी पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्यातच कोरोनामुळे ऑस्ट्रेलियन टीम घराबाहेरही पडली नव्हती. पाकिस्तानला घरच्या पिचचा, वातावरणाचा फायदा घेण्याची पूर्ण संधी होती. तसा फायदा प्रत्येक टीम घेते. पण पाकिस्ताननं फायदा घेण्याच्या प्रयत्नात स्वत:साठीच खड्डा खोदला.

रावळपिंडीमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये फक्त 12 विकेट्स गेल्या. तेथील पाटा पिचवर आयसीसीनंही ताशेरे ओढले. त्यानंतर कराचीमध्ये चांगलं क्रिकेट पाहयला मिळेल अशी आशा होती. पण, तिथं पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरच (Pakistan 148 all out) उलटला.

पाकिस्तानचा मोठा पचका, रावळपिंडीच्या पिचवरून ICC नं काढली लाज!

दमवले आणि रडवले!

ऑस्ट्रेलियानं कराची टेस्टमध्ये टॉस जिंकतात पाकिस्तानचे सर्व डावपेच निष्फळ होत असल्याचं दिसू लागलं. क्रिकेटमध्ये टॉस हरण्याची शक्यता किमान 50 टक्के असते. त्यामुळे प्रत्येक टीम टॉसनंतर मनासारखं काम (आधी बॅटींग किंवा बॉलिंग) मिळालं नाही, तर काय करावं याचा विचार करून येते. पण, हा सामान्य नियम पाकिस्तानला लागू नसावा.

टॉस गमावताच पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या (Babar Azam) साऱ्या डावपेचांना गंज चढला. त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून निगेटीव्ह बॉलिंग केली. रावळपिंडीनंतर कराचीमध्येही बॉलर्सना पिचची कोणतीही साथ मिळत नव्हती. त्याचा ऑस्ट्रेलियन टीमनं भरपूर फायदा घेतला. दोन दिवसांपेक्षा जास्त मनसोक्त बॅटींग करत पहिली इनिंग 9 आऊट 556 रनवर घोषित केली

पाकिस्तानची नामुश्की

ऑस्ट्रेलियानं 556 रन केल्यावर पाकिस्तानला आघाडी घेणे अवघड आहे, हे सर्वांनाच माहिती होते. पण, त्यांना ते इतके अवघड असेल, असे कमी जणांना वाटले. पाकिस्तानचे बॅटर कराचीत नाही तर पर्थ किंवा ब्रिस्बेनमध्ये खेळत असल्यासारखे 148 रनवर ऑल आऊट झाले.

ज्या पिचवर शाहिन आफ्रिद्रीसारखा (Shaheen Afridi) पाकिस्तानचा वर्ल्ड क्लास बॉलर पहिल्या दोन दिवसांमध्ये एकही विकेट मिळवू शकला नाही तिथं मिचेल स्टार्कनं 3 विकेट्स घेत पाकिस्तानच्या बॉलिंगचा क्लास दाखवला. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी डेड पिचवरही ‘डेडली’ बॉलिंग करत पाकिस्तानवर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 408 रनची आघाडी घेतली.

पाकिस्तानी खेळाडूचा संताप अनावर, सहकाऱ्याला मारली थप्पड, पाहा VIDEO

बॉलर्सना विश्रांती मिळावी आणि पाकिस्तानला लाहोर टेस्टपूर्वी आणखी दमवण्यासाठी ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला ‘फॉलो ऑन’ दिला नाही. आता या टेस्टमधील पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानच्या टीमला (Pakistan 148 all out) मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

  

error: