फोटो – ट्विटर, आयसीसी

पाकिस्तान क्रिकेट टीमनं (Pakistan Cricket Team) घराच्या मैदानावर नामुश्की टाळली आहे. पाकिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कराचीमध्ये झालेली टेस्ट पाकिस्ताननं अखेर ड्रॉ (Pakistan Save Karachi Test) केली आहे. ऑस्ट्रेलियन टीम 24 वर्षांनी पकिस्तानच्या दौऱ्यावर आली आहे. पाकिस्तानसाठी कराची हे अंगण होते. तरीही त्यांना संपूर्ण टेस्टमध्ये मॅच वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागला. होम ग्राऊंडवर हार टाळली, ही पाकिस्तानसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. त्याचबरोबर बाबर आझमची (Babar Azam) सेंच्युरी ही त्याच्या फॅन्सना दिलासा देणारी आहे. पाकिस्तानने या टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये 172 ओव्हर बॅटींग करत 7 आऊट 443 रन केले. इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 1939 साली झालेल्या टाईमलेस टेस्टनंतर एखाद्या टीमनं चौथ्या इनिंगमध्ये सर्वाधिक काळ बॅटींग केली आहे.

3 दिवसांवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व

पाकिस्तानला होम ग्राऊंडवर टेस्ट वाचवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. कराचीतील पिचवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सनं (Pat Cummins) टॉस जिंकला. त्यानंतर पहिल्याच दिवशी पाकिस्तानच्या स्पिनर्सनी निगेटीव्ह बॉलिंग करत शस्त्र टाकली होती. बॉलर्सना मदत न करणाऱ्या कराचीतील संथ पिचवर ऑस्ट्रेलियानं महासंथ बॅटींग करत दोन दिवसांपेक्षा जास्त बॅटींग करत 9 आऊट 556 रन केले. ऑस्ट्रेलियन टीममधील कराची बॉय उस्मान ख्वाजानं (Usman Khawaja) या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावली.

556 रनच्या स्कोअरमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला पहिल्या इनिंगमध्ये दाबून टाकलं. पाकिस्तानची पहिली इनिंग 148 रनवर ऑल आऊट झाली. कराचीमधील ‘डेड पिच’वर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी डेडली बॉलिंग करत पाकिस्तनला फक्त 53 ओव्हर्समध्ये गुंडाळले. पहिल्या इनिंगमध्ये 408 रनची आघाडी घेऊनही ऑस्ट्रेलियानं ‘फॉलो ऑन’ लादला नाही.

पाकिस्तान टेस्ट क्रिकेटचा ‘कच्चा पापड’ कराचीत करपला, ऑस्ट्रेलियानं केले वाईट हाल!

अखेर बाबर खेळला

ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या इनिंगमध्ये 2 आऊट 97 रन केले. त्यांनी पाकिस्तानसमोर मॅच जिंकण्यासाठी 506 रनचं टार्गेट ठेवलं. 24 वर्षांनी पाकिस्तानला आलेल्या आणि कराचीमध्ये कधीही पाय न ठेवलेल्या ऑस्ट्रेलियन टीमची अशी अवस्था होईल, असा पाकिस्तानी फॅन्ससह अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा अंदाज होता पण मॅच वाचवण्याची वेळ पाकिस्तानवर आली होती.

पाकिस्तानच्या या अवघड परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम त्याच्याकडून अपेक्षित असलेली इनिंग खेळला. त्याने फेब्रुवारी 2020 नंतर पहिल्यांदाच टेस्ट क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावली. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर 6 वर्षांनी त्याने पहिल्यांदाच चौथ्या इनिंगमध्ये सेंच्युरी केली. सहा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत बाबरची ही सहावी टेस्ट सेंच्युरी आहे. पाकिस्तानला सर्वाधिक गरज असताना ही सेंच्युरी (Pakistan Save Karachi Test) झळकावली. बाबरने 196 रन केले. बाबर आझमला तिसरीच टेस्ट खेळणाऱ्या अब्दुल्ला शफिकनं 305 बॉल 96 रनची संयमी इनिंग खेळत खंबीर साथ दिली.

रिझवानने वाचवली मॅच

बाबर आझम आऊट झाल्यानंतर पाकिस्तानचा पराभवाचा धोका टळला नव्हता. त्या अवघड परिस्थितीमध्ये मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने मॅच वाचवली. रिझवानने त्याची दुसरी टेस्ट सेंच्युरी झळकावली. तो 104 रन काढून नॉट आऊट राहिला. रिझवाननं तळाच्या खेळाडूंच्या साह्यानं कराचीचा किल्ला लढवला. त्याने संकटाच्या परिस्थितीमध्ये बॅट संपूर्ण म्यान केली नाही. आवश्यक तिथं फटकेबाजी केली.

पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या इनिंगमध्ये सेंच्युरी करणारा रिझवान हा दुसरा विकेट किपर आहे. त्यापेक्षाही महत्त्वाचे त्याने पाकिस्तानसाठी कराची टेस्ट वाचवण्यात मोलाचे योगदान (Pakistan Save Karachi Test) दिले. घराच्या मैदानात पराभवाची नामुश्की टाळण्यात पाकिस्तानला यश आले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: