फोटो – ट्विटर / ICC

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टवर न्यूझीलंडनं  तिसरा दिवशी आलेला पाऊस देखील न्यूझीलंड्सच्या रन्सचा प्रवाहावर पाणी टाकू शकला नाही. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस न्यूझीलंडकडं 354 रन्सची आघाडी आहे. ही टेस्ट जिंकून ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (ICC World Test Championship) फायनलच्या दिशेनं दमदार पाऊल टाकण्याची संधी न्यूझीलंडला आहे.

विल्यमसन ऑन टॉप!

न्यूझीलंडनं पहिली इनिंग 6 आऊट 659 रन्सवर घोषित केली. कॅप्टन केन विल्यमसननं (Kane Williamson) चौथी डबल सेंच्युरी झळकावत त्याचा फॉर्म कायम ठेवला. विल्यमसनची ही तीन टेस्टमधील दुसरी डबल सेंच्युरी आहे. यापूर्वी त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 251 रन्स काढले होते. विल्यमसननं यावेळी टेस्ट क्रिकेटमध्ये सात हजार रन्सचा टप्पाही पार केला.या दरम्यान त्यानं सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांचा 6996 रन्सचा टप्पा मागे टाकला. ब्रॅडमन यांनी 52 टेस्टमधील 80 इनिंगमध्ये 99.94 च्या सरासरीनं 6996 रन्स काढले होते. विल्यमसननं  83 व्या टेस्टमधील 144 व्या इनिंगमध्ये 7 हजारचा टप्पा पूर्ण केला.  

( वाचा : NZ vs PAK: केन विल्यमसनची सलग तिसऱ्या टेस्टमध्ये सेंच्युरी, अनेक रेकॉर्ड्सना गवसणी )

न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करण्याच्या यादीत आता विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता त्याच्यपुढे रॉस टेलल (Ross Taylor) 7,379 रन्स आणि स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) 7,172  रन्स हे दोन न्यूझीलंडचे बॅट्समन आहेत. न्यूझीलंडकडून टेस्टमध्ये सर्वात जास्त डबल 4 सेंच्युरी झळकावण्याच्या ब्रँडन मॅकलमच्या (Brendon McCullum) विक्रमाची त्यानं बरोबरी केली आहे.

…सहकाऱ्यासाठी लाबंवली इनिंग

विल्यमसन क्रिकेट विश्वात एक सभ्य खेळाडू म्हणूनही ओळखला जातो. या टेस्टमध्ये त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. न्यूझीलंडचा ऑल राऊंडर डॅरील मिचेलच्या (Daryl Mitchell) पहिल्या टेस्ट सेंच्युरीसाठी त्यानं इनिंग उशीरा घोषित केली. मिचेल 82 रन्सवर होता तेंव्हा विल्यमसननं त्याला एक ओव्हर शिल्लक आहे, असा इशारा केला होता. मात्र त्यानंतर त्यानं त्याला सेंच्युरीसाठी आणखी तीन ओव्हर्सचा अवधी दिला. मिचेलनं 112 बॉल्समध्ये नाबाद 102 रन काढले. मिचेलला पहिल्या टेस्ट सेंच्युरीसाठी विल्यमसननं केलेली मदत कायम लक्षात राहणार आहे.

पाकिस्तानचा स्वैरपणा

न्यूझीलंडची टीम नवीनवी शिखरं सर करत असताना पाकिस्तानच्या टीमनं आणखी तळ गाठण्यात कोणतीही हलगर्जी केली नाही. पाकिस्तानचा विकेटकिपर कॅप्टन मोहम्मद रिझवाननं (Mohammad Rizwan) सर्वात जास्त बाय रन्स देण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. त्यानं एकूण 27 रन्सची खिरापत बाईजमध्ये वाटली. टेस्ट क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटकिपर-कॅप्टननं दिलेले हे सर्वात जास्त बाईज आहेत. पाकिस्तानच्या बॉलर्सनंही आपल्या कॅप्टनला पूर्ण साथ दिली. त्यांनी या इनिंगमध्ये 17 वाईड बॉल टाकले. जो पाकिस्तानी रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर पाकिस्ताननं एकूण 12 नो बॉल टाकत ‘स्वैरपणाच्या मर्यादा’ ओलांडण्यात संकोच केला नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: