फोटो – ट्विटर/ICC

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनची (Kane Williamson)  सेंच्युरी हे न्यूझीलंडच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. विल्यमसनची ही सलग तिसरी टेस्ट सेंच्युरी आहे. यापूर्वी त्यानं वेस्ट इंडिजविरुद्ध 251 आणि पाकिस्तानविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये 129 रन्स काढले होते.

विल्यमसननं या सेंच्युरीतील 50 ते 100 हा टप्पा फक्त 35 बॉल्समध्ये पूर्ण केला. त्यानं यामध्ये एकाच ओव्हरमध्ये सलग चार फोर लगावत 78 वरुन 94 रन्सवर झेप घेतली.

विल्यमसननं या सेंच्युरीबरोबरच अनेक रेकॉर्डही केले आहेत.

विल्यमसनची ही 24 वी टेस्ट सेंच्युरी आहे. विल्यमसननं या सेंच्युरीबरोबर वीरेंद्र सेहवाग, केव्हिन पिटरसन, जावेद मियाँदाद आणि जस्टीन लँगर यांना मागं टाकलं आहे. आता तो मोहम्मद युसूफ, डेव्हिड वॉर्नर आणि व्हिव रिचर्ड्स या तिघांच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे.

टेस्ट क्रिकेटमधील सध्याच्या टॉप थ्री बॅट्समन्सच्या सेंच्युरींच्या शर्यतीमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) 27 तर ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्हन स्मिथनं 26 सेंच्युरी झळकावल्या आहेत.

विराट कोहली27
स्टीव्हन स्मिथ26
केन विल्यमसन24

विल्यमसनची पाकिस्तानविरुद्ध ही चौथी टेस्ट सेंच्युरी आहे. ही कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा एकमेवर बॅट्समन आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडकडून टेस्टमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या यादीतही तो पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये रॉस टेलर (Ross Taylor) दुसऱ्या तर मार्टीन क्रो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केन विल्यमसन1116
रॉस टेलर999
मार्टीन क्रो973

न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये 1 हजार पेक्षा जास्त रन्स आणि 50 पेक्षा जास्त सरासरी असलेला विल्यमसन हा एकमेव बॅट्समन आहे.न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वेळा 50 पेक्षा जास्त रन्स करण्याच्या यादीमध्येही त्यानं माजी कॅप्टन स्टीफन फ्लेमिंगला (Stephen Fleming) मागं टाकलं आहे. या यादीमध्ये रॉस टेलर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

केन विल्यमसन56
स्टीफन फ्लेमिंग55
रॉस टेलर53

मागच्या तीन वर्षात टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जास्त रन्स करणाऱ्या बॅट्समन्समध्ये विल्यमसनची सरासरी ही सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन (Marnus Labuschange) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

* बातमीमधील सर्व आकडेवारी ही 3/1/2021 पर्यंतची आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: