फोटो – ट्विटर

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) यांच्यात झालेली दुसरी वन-डे फखर झमान (Fakhar Zaman) याच्या एकाकी लढतीमुळे लक्षात राहणार आहे. फखर झमाननं 155 बॉलमध्ये 193 रन काढले. ओपनिंगला आलेला फखर अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानं एका बाजूनं एकाकी संघर्ष करुनही पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेनं दिलेलं 342 रनचं टार्गेट पूर्ण करता आलं नाही.

क्रिकेटमध्ये टीम वर्क किती आवश्यक आहे, याचा प्रत्यय फखरची खेळी पाहताना आला. फखरनं दोन वर्षांनी वन-डे मध्ये सेंच्युरी झळकावली. जोहन्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर पाकिस्तानच्या बॅट्समनची ही पहिली सेंच्युरी आहे.. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या प्रसिद्ध मॅचमध्ये हर्षल गिब्जनं (Herchelle Gibs) याचा याच मैदानावरचा 175 रनचा वैयक्तिक विक्रमही मोडला. पण त्याला दुसऱ्या बाजूनं भक्कम साथ मिळाली नाही. क्रिकेट विश्वात वन-डे मॅच जिंकण्यात अपयशी ठरलेली दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक इनिंग तो खेळला. झिम्बाब्वेच्या चार्ल्स कोव्हेंट्रीनं (Charles Coventery) बांगलादेश विरुद्ध नाबाद 194 रन काढले होते. तरीही झिम्बाबे पराभूत झाली होती. कोव्हेंट्रीचा तो दुर्दैवी विक्रम आज फक्त 1 रननं वाचला.

फखरला साथ मिळालीच नाही

पाकिस्ताननं आजवर कधीही वन-डे क्रिकेटमध्ये 342 रनचं टार्गेट यशस्वी पूर्ण केलेलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्येही पाकिस्तानची टीम शेवटपर्यंत आवश्यक रन रेटच्या मागेच होती. मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना चांगली सुरुवात, काही चांगल्या पार्टरनरशिप, तसंच दोन किंवा तीन जणांच्या उपयुक्त खेळी या गोष्टी आवश्यक असतात.पाकिस्तानला यापैकी काहीही करता आलं नाही.

फखर झमाननं (Fakhar Zaman)  193 रन काढले. पण त्यानंतर पाकिस्तानच्या टीममधील सर्वोच्च सर्वोच्च स्कोअर होता 31. बाबर आझमनं (Babar Azam) 31 रन काढले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी दिलेल्या 25 अतिरिक्त रनचा पाकिस्तानच्या स्कोअरमध्ये सर्वात मोठा वाटा होता.

( VIDEO: ‘रिव्हर्स स्विंगसाठी वकार युनूस लबाडी करत होता’ पाकिस्तानच्या बॉलरचा घरचा आहेर )

5, 0, 9, 13, 19 आणि 11 असा फखर आणि बाबर सोडून अन्य पाकिस्तानच्या बॅट्समचा या मोठ्या टार्गेटचा पाठलाग करताना वाटा होता. पाकिस्तानची अवस्था 38 व्या ओव्हरला 7 आऊट 205 अशी झाली होती. त्यानंतर फखरच्या एकाकी लढतीमुळे पराभवातील अंतर कमी झालं.

शाहीन आफ्रिदी आणि हसन रौफ या पाकिस्तानच्या बॉलरला बॅटींग अजिबात येत नाही. त्याचा फटका देखील फखरला बसला. त्यांना स्ट्राईकपासून वाचवण्यात त्याची शक्ती गेली. जिथं प्रत्येक बॉलला रन महत्त्वाचा होता तिथं या दोघांना वाचवण्यासाठी फखरनं अनेकदा एक रन घेणं टाळलं. 49 ओव्हरमध्ये फक्त 7 निघाले. पाकिस्तानला मॅच जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 31 रन हवे होते. त्यावेळी पहिल्या बॉलवर फखर (Fakhar Zaman)  रन आऊट झाला आणि त्याचवेळी शेवटच्या ओव्हरमध्ये मोठा चमत्कार होईल या आशेनं मॅच पाहत असलेल्या पाकिस्तानी फॅन्सच्या आशा संपल्या.

( वाचा : पाकिस्तानी क्रिकेटचं इस्लामीकरण करण्यासाठी इंझमामला जबाबदार का धरले जाते? )

दक्षिण आफ्रिकेचे सांघिक प्रयत्न

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी केलेल्या सांघिक प्रयत्नामुळे त्यांना 50 ओव्हरमध्ये 6 आऊट 341 रन करता आले. दक्षिण आफ्रिकेच्या चौघांनी हाफ सेंच्युरी केली. डेव्हिड मिलर (David Miller) याने फक्त 27 बॉलमध्ये नाबाद 50 रनची आक्रमक खेळी केली. यामध्ये 3 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. मिलरच्या या आक्रमक खेळीमुळेच फखरनं 193 रन करुनही विजयी टार्गेट शेवटपर्यंत पाकिस्तानच्या आवाक्याच्या बाहेर राहिलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: