फोटो – ट्विटर, पीसीबी मीडिया

T20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) 17 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी काही जाहीर झाल्या आहेत. उर्वरित टीम पुढील काही दिवसांमध्ये जाहीर होतील. क्रिकेट विश्वात सध्या प्रत्येक देशाच्या टीम कॉम्बिनेशनवर चर्चा सुरू आहे. पाकिस्तानने देखील त्यांची टीम सोमवारी (6 सप्टेंबर) रोजी जाहीर केली आहे. पण तिथं सध्या वेगळाच माहौल (नेहमीचा माहौल) आहे. कारण टीमची निवड होताच काही तासांमध्ये पाकिस्तानचा हेड कोच मिसबाह उल हक (Misbah ul Haq) आणि बॉलिंग कोच वकार युनूस (Waqar Younis) यांनी पदाचा राजीनामा (Pakistan coach steps down) दिला आहे.

मिसबाह आणि वकार यांची 2019 साली या पदावर निवड करण्यात आली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी त्यांनी केलेल्या कराराचे 1 वर्ष अद्याप बाकी होते. आता खूप, खूप वर्षांनी न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन देशांच्या टीम छोट्या दौऱ्यासाठी पाकिस्तानात येणार आहेत. त्यानंतर लगेच पाकिस्तान T20 वर्ल्ड कप खेळणार आहे. टीमला सर्वाधिक गरज असतानाच्या काळात या दोघांनीही एकाच दिवशी राजीनामा दिला आहे.

मिसाबहचं कारण काय?

पाकिस्तान क्रिकेटमधील ‘मिस्टर अनफिट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिसबाहनं कौटुंबिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितलंय. ‘वेस्ट इंडिजची सीरिज संपल्यानंतर मी जमेकामध्ये कोरोनामुळे क्वारंटाईन होतो. त्यावेळी मी माझ्या मागील दोन वर्षांच्या करिअर ग्राफचा विचार केला. त्यावेळी आता कुटुंबाला वेळ द्यायला हवा असा मी निर्णय घेतला. माझ्या राजीनाम्याचं हे मोठं कारण आहे.

माझ्या राजीनाम्याची वेळ योग्य नाही, याची मला जाणीव आहे. पण आगामी आव्हानं स्विकारण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाही. त्यामुळे कुणीतरी फ्रेश मनस्थितीमध्ये ही जबाबदारी घेणे योग्य आहे.’  असं मिसबाहनं (Pakistan coach steps down) सांगितलं.

पाकिस्तान क्रिकेटमधील मिस्टर अनफिट!

वकार म्हणाला…

मिसाबहनं राजीनामा देताच पाकिस्तानचा बॉलिंग कोच वकार युनूसनंही पदाचा राजीनामा दिला. ‘मिसाबहनं त्याच्या भविष्यातील योजना माझ्याशी शेअर केल्यानंतर मी देखील या पदाचा राजीनामा देणे योग्य आहे. आम्ही एकत्र ही जबाबदारी स्विकारली, आता एकत्र पद सोडत आहोत.

पाकिस्तानच्या तरुण बॉलर्ससोबत काम करताना मजा आली. त्यांच्यामध्ये भरपूर योग्यता आहे. मागील 16 महिन्यात बायो-बबलमध्ये राहणे हा एक अनुभव होता. जो अनुभव मी माझ्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये कधी घेतला नव्हता.’ असं वकार (Pakistan coach steps down) म्हणाला आहे.

Explained: पाकिस्तान फास्ट बॉलर्सची खाण आहे! तर 26 वर्षांपासून ‘हे’ का जमत नाही?

हंगामी कोचची नियुक्ती

पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं या दोघांचाही राजीनामा स्विकारला असून सकलेन मुश्ताक (Saqlain Mushtaq) आणि अब्दुल रझ्झाक (Abdul Razzaq) यांची हंगामी कोच म्हणून नियुक्ती केली आहे. T20 वर्ल्ड कपच्या अगदी तोंडावर आणि टीमची निवड होताच काही तासांमध्ये राजीनामा देत या दोघांनीही पाकिस्तान क्रिकेटमध्ये मतभेद आणि गटबाजीचे नेहमीचे वारे वाहत असल्याचं दाखवून दिलं (Pakistan coach steps down) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: